Team Agrowon
राज्यात पेरू, सीताफळ आणि ड्रगनफ्रुट (Dragon Fruit) या फळपिकांखालील लागवड क्षेत्राचा विस्तार वाढता आहे. कृषी विभागाने ‘अपेडा’शी पत्रव्यवहार करीत हॉर्टनेट विभागातील अन्य फळ (अदर फ्रूट) श्रेणीत पेरू-सीताफळ-ड्रॅगन फ्रूट या फळांचा समावेश करण्यात यश मिळविले आहे.
रेसिड्यू फ्री किंवा चांगल्या प्रतीचा शेतीमाल उत्पादक असणाऱ्या भाजीपाला, फळ तसेच इतर प्रकारचा शेतीमाल उत्पादकांना नोंदणीची सुविधा ‘अपेडा’ने आपल्या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
बेर, लिची, अननस, वॉटरचेस्टनट, वूड ॲपल (कवठ), केळी, जांभूळ या सात फळपीक उत्पादकांनाच यापूर्वी नोंदणी करता येत होती. आता मात्र पेरू, सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट या तीन नव्या फळपिकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
पेरू, सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट या फळपीक उत्पादकांना बागांची नोंदणी अन्य फळ श्रेणीत नोंदणी करता येणार आहे. बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल.
या माध्यमातून महाराष्ट्रासह देशांतर्गत चांगल्या व निर्यातक्षम प्रतीच्या फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा डाटाबेस उपलब्ध होणार आहे.
पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट या तीन नव्या पिकांचा अंतर्भाव अन्य फळ श्रेणीत करण्यात आला आहे. परिणामी, या बागायतदारांना नोंदणी करता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.