Silk Production: रेशीम शेतीतून ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

Gopal Hage

बुलडाणा जिल्ह्यातील राजगड येथील पंजाबराव बाबूसिंग जाधव यांनी दर्जेदार रेशीम कोष उत्पादनातून त्यांनी ‘लखपती शेतकरी’ होण्याची मान मिळविला आहे. आपल्या तुतीच्या शेतात कुटुंबासह शेतकरी पंजाबराव जाधव.

Silk Production | Agrowon

जाधव यांनी सोयाबीन, तूर या पारंपारिक पीकपद्धतीस छेद देत २०२० मध्ये रेशीम शेतीत पाऊल टाकले. त्यांनी एक एकर शेतामध्ये तुतीची लागवड केली.

Silk Production | Agrowon

कोष निर्मितीसाठी शेड उभारणीचे काम जाधव दुसरीकडे सुरू केले. तुतीचा पाला उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांतच रेशीम कोष उत्पादनाला सुरुवात केली.

Silk Production | Agrowon

पहिल्या बॅचपासून २०२ किलो ४९ ग्रॅम कोष उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो ४१५ दर मिळाला. पहिलीच कमाई ८४ हजार ३३ रुपयांची झाली. एका बॅचमध्ये २८ दिवसांत चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.

Silk Production | Agrowon

जाधव यांना तीन बॅचमध्ये एक एकरातून वर्षभरात त्यांना २ लाख ७५ हजार ११३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादित संपूर्ण रेशीम कोषाची जालना येथील बाजारात विक्री केली. रेशीम कोषापासून लाखांवर उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्याला रेशीम विभाग ‘लखपती शेतकरी’ म्हणून संबोधतो.

Silk Production | Agrowon

पंजाबराव जाधव यांना रेशीम शेतीत मिळालेले यश पाहून त्यांच्या भागातील आणखी ५ ते ६ शेतकरी पुढे आले आहेत.

Silk Production | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon
येथे क्लिक करा