Anuradha Vipat
दैनंदिन जीवनातील अडथळे, मानसिक तणाव किंवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शास्त्रात काही प्रभावी मंत्रांचा उल्लेख केला आहे.
कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ॐ गं गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ हा मंत्र किमान १०८ वेळा म्हणा
जर मन अस्वस्थ असेल किंवा भविष्याची भीती वाटत असेल, तर भगवान शंकरांचा ॐ नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र: ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
सतत पैशांची चणचण भासत असेल तर लक्ष्मी मातेचा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः॥ हा मंत्र म्हणा.
अकारण येणारी संकटे किंवा नकारात्मक उर्जेचा त्रास होत असल्यास ॐ हं हनुमते नमः किंवा रोज 'हनुमान चालीसा' चे पठण करावे.
कधीकधी पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीमुळे समस्या संपत नाहीत, अशा वेळी नमः सूर्याय चन्द्राय मङ्गलाय बुधाय च। गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः॥ हा मंत्र म्हणावा.
मंत्रांचा प्रभाव पडण्यासाठी ते रोज ठराविक वेळी आणि श्रद्धेने म्हणावेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.