Team Agrowon
सफेद वाणाच्या तुलनेत ही थंडी रंगीत वाणांसाठी फायद्याची आहे; मात्र ढगाळ वातावरण व थंडी अशीच राहिल्यास मणी तयार झालेल्या व साखर उतरण्याच्या अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये तडे जाण्यासह भुरी, मिलीबग येण्याची शक्यता आहे.
द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले असून संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जात आहेत.
गुरुवारी किमान तापमानात वाढ झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने अडचणी वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळी अनेक ठिकाणी धुके पडले होते. तर दुपारपर्यंत हवेत गारवा अधिक जाणवला. या परिस्थितीत द्राक्ष, कांदा यांसारख्या पिकावर संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस वातावरण नेमके कसे राहील यावर सर्व अवलंबून असेल. त्यामुळे निरीक्षणे नोंदवून शिफारशींनुसार फवारण्या घेण्याची गरज आहे,
बागांच्या अवस्थेनुसार द्राक्षमणी वाढ व फुगवण मंदावण्याची शक्यता
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.