Team Agrowon
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सध्या याचे नियोजनही सुरू झाले आहे.
यंदा या हप्त्यासोबतच राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचीही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मात्र, या दोन्ही योजनेला पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना अटींच्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असून यासाठी ३० एप्रिलपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी अटींची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे अनिवार्य केले आहे.
यासाठी शेतकऱ्यांना योजनेचे समन्वयक असलेल्या तहसीलदारांकडून नोंदी अद्ययावत करून घ्याव्या लागणार आहेत.
शेतकऱ्यांना बँक खाते आधार क्रमांकाला जोडणेही बंधनकारक केले आहे. तसेच शेतकऱ्यांना ई-केवायसी करणेदेखील बंधनकारक केले आहे.
या अटींची पूर्तता केल्याशिवाय शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.