Team Agrowon
बऱ्याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतात. यासाठी वनौषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो.
अग्निशिखा, गोखरु, अडुळसा, कोरफड या वनस्पती जनावरांच्या आजारात जनावरे बरे होण्यासाठी मदत करतात.
गोखरु ही मूत्र संस्थेवर कार्य करते. काटेरी फळांमध्ये भाकड जनावर माजावर येण्यासाठी आवश्यक इस्ट्रोजन संप्रेरकाची निर्मिती करण्याची क्षमता.
अग्निशिखा ही वनस्पती जनावरांच्या प्रजननक्षम संप्रेरकाच्या स्त्रावासाठी उत्तेजक आहे.
शिलाजीत वनस्पती शुक्राणूची दुर्बलता, मधुमेह, मूत्रसंस्थेचे विकार इत्यादी आजारावर अत्यंत उपयुक्त आहे.
पुत्र जीवा गर्भ काळात आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती करण्यास उपयोगी. गर्भाच्या वाढीला सहकार्य करते.
पोटफुगी झाल्यावर ओवा २० ग्रॅम, धणे १० ग्रॅम, जिरे १५ ग्रॅम, बडीशेप १० ग्रॅम, हळद १५ ग्रॅम, काळे मीठ ३० ग्रॅम याचा वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.