Team Agrowon
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील या वर्षी पावसाने खरीप हंगाम वाया गेला आहे.
परतीच्या पावसाने रब्बी हंगामाची आशादेखील मावळली आहे.
ग्रामीण भागात सरकारी पातळीवर रोजगाराची काहीही शाश्वती नाही.
गावात राहून करायचे काय, असा प्रश्न अनेक शेतकरी, शेतमजुरांपुढे आहे. अशा भीषण परिस्थितीमुळे दुष्काळी भागातील अनेक शेतकरी यंदा ऊसतोडणीसाठी जात आहेत.
खरे तर मागील दोन-तीन वर्षांत चांगल्या पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊसतोडणी मजुरांची संख्या घटली होती.
शेतशिवारात पाणी उपलब्ध झाल्याने नियमित ऊसतोडणीला जाणारे मजूरही या कामावर जात नव्हते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.