आरोग्याच्या नियमांचे पालन करून विक्रीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
आरोग्याच्या नियमांचे पालन करून विक्रीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.  
यशोगाथा

औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्री

Santosh Munde

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी ते ग्राहक' थेट फळे- भाजीपाला विक्रीचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला आहे. जिल्हा प्रशासनासह महानगरपालिकेची साथ त्यास मिळाली या उपक्रमात आरोग्य सुरक्षितचेचे नियम पाळून चार दिवसांच्या कालावधीत फळे व भाजीपाला मिळून सुमारे साडे २९ टन टन मालाची थेट विक्री झाली. सुमारे सात लाख रूपयांहून अधिक उलाढाल झाली. शेतकरी ते ग्राहक ही साखळी मजबूत होण्यास मदत मिळाली.   कोरोना संकटाचा फटका राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. औरंगाबाद जिल्हाही त्यास अपवाद नाही. जिल्ह्यातील भाजीपाला व फळ उत्पादकांना अशा काळात रास्त बाजारपेठ मिळावी, त्यांच्या मालाचा उठाव व्हावा यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच औरंगाबाद शहरातील निवासी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव तसेच जे शेतकरी गट विक्री करण्यास उत्सुक आहेत त्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा असे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची या कामांसाठी नियुक्ती केली. उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हदगावकर, मंडळ अधिकारी विश्वास जाधव यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांचे मोबाईल क्रमांक व्हॉटस ॲप ग्रूपवर देण्यात आले. विक्री व्यवस्था पध्दत

  • योग्य सामाजिक अंतर राखण्यासाठी फळे व भाजीपाला बास्केटची संकल्पना. त्यात वसाहत संघटनेचे अध्यक्ष सोसायट्यांकडून मालाची ऑर्डर घेण्यास सुरूवात.
  • सुटा शेतमाल कोणीच विकू नये असा नियम. फळे व भाजीपाला यांची विशिष्ट वजनाची बास्केट करावी. प्रति सोसायटीमध्ये २५ बास्केटपेक्षा जास्त ऑर्डर आल्यास ती स्विकारायची.
  • शेतमाल वाहनासोबत एक किंवा दोनच व्यक्ती असाव्यात.
  • विक्रेता आजारी नसावा.
  • हॅन्ड ग्लोज, मास्क लावणे गरजेचे
  • विक्री करताना वाहन चालक आणि शेतकरी प्रतिनिधी एवढ्यांनीच सोसायटीमध्ये प्रवेश करावा
  • रांग लावून किमान एक ते दीड मीटर अंतर ठेवून माल विकावा. कुणालाही भाजीपाल्याला हात लावू देऊ नये.
  • विक्रेत्यांना विक्रीनंतर घरी गेल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी स्नान करून कपडे स्वच्छ धुण्यास देणे गरजेचे.फ्रान्सिस यांची मदत.
  • सोशल मीडियाचा विक्रीसाठी नावीन्यपूर्ण वापर. शेतकरी गटांची यादी, त्यांनी तयार केलेल्या जाहिरातींचा त्याद्वारे प्रसार.
  • शेतकऱ्यांचा प्रतिसाद, चांगली उलाढाल पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड व सोयगाव भागातील सुमारे ३९ शेतकरी उत्पादक कंपन्या वा गट थेट विक्रीसाठी पुढे आले. त्यांना वाहतुकीचा परवाना कृषी विभागाच्या समन्वयातून देण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाने केले. या उपक्रमात २९ मार्च ते एक एप्रिल या कालावधीत सुमारे साडे २९ टन टन मालाची (फळे व भाजीपाला) थेट विक्री झाली. यात १३ टन भाजीपाला तर साडे १६ टन फळांचा समावेश होता. या विक्रीतून सुमारे सात लाख रूपयांहून अधिक उलाढाल झाली. शेतकरी बाजारांचे पुनरुज्जीवन आपल्याकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी घेण्याचे काम या विक्री व्यवस्थेत शेतकरी गटांनी केले. कायमस्वरूपी विक्री साखळी मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न उपयोगी पडणार असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जवळपास अडीच वर्षांपासून औरंगाबाद शहरात काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडे बाजार कोरोनाच्या संकटामुळे मार्चपासून बंद करण्यात आला होता. परंतु थेट विक्री उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा आरोग्य सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून हा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे. आता शहरात तीन ठिकाणी आठवड्यात तीन वेळा भरण्याचे त्याचे नियोजन आहे. प्रतिक्रिया शेतकरी आठवडे बाजाराचे पुनरुज्जीवन आम्हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. शिवाय ग्राहकांनाही ताजा भाजीपाला व फळे वाजवी दरात पुरवणे शक्य झाले आहे. -विलास भेरे-९४०४४७८९३८ निसर्ग राजा शेतकरी गट, कोनेवाडी ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरविताना आम्ही सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतो. थेट विक्रीतून जोडले जाणारे ग्राहक कायमस्वरूपी जोडून ठेवण्यासाठी त्यांची नोंद घेतो आहोत. -देविदास बनकर- ९८२३३३८१५९ गोमाता शेतकरी गट आंबेलोहळ, ता गंगापूर शेतकऱ्यांकडून थेट बांधावरून माल खरेदी करून तो ग्राहकांना पोच करीत आहोत. ग्राहकांची गरज व शेतकऱ्याच्या उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. -विठ्ठल भोसले-९९२१८३५६५७ जडगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी आम्ही भाजीपाला व फळे यांची बास्केट तयार करून ग्राहकांना पोचवित आहोत. वाजवी दरात देत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे. -निवृत्ती कागदे, ९०९६४७४१९९ युवा माऊली शेतकरी गट लाखेगाव, ता पैठण लॉकडाऊनमुळे द्राक्षविक्रीचा प्रश्न उभा ठाकला. थेट ग्राहकांना विक्री करून होणारे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाजी घावटे-९१५८२७११३७ द्राक्ष उत्पादक, सटाणा, जि. औरंगाबाद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबद बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासह शेतकऱ्यांनाही थेट विक्रीची संधी मिळावी ही कल्पना सुचली. काही गटांसोबत बोललो. त्यांना कल्पना आवडली. इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी त्यांच्या संपर्क प्रमुखांसह तयार केली. आता उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शेतकरी ते ग्राहक ही साखळी मजबूत होत आहे. डॉ. तुकाराम मोटे- ९४२२७५१६०० जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद अनिल हदगावकर-९४२१३१६०९३ उपविभागीय कृषी अधिकारी तथा संपर्क अधिकारी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT