Tea industry seeks special financial package
Tea industry seeks special financial package  
मुख्य बातम्या

चहा उद्योग क्षेत्राला हवंय स्पेशल पॅकेज !

टीम अॅग्रोवन

चहा उद्योग क्षेत्र (Indian Tea Industry)सध्या प्रचंड संकटात असून या क्षेत्राला केंद्र सरकारने विशेष आर्थिक मदत करावी, असं आवाहन इंडियन टी असोसिएशनने केंद्र सरकारकडे केलंय. बिझनेस लाईनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.  

चहा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी नुकतंच संसदेच्या वाणिज्यविषयक स्थायी समितीकडे आपली कैफियत मांडली आहे.

इंडियन टी असोसिएशनचे (Indian Tea Association) महासचिव अर्जित रहा (Arijit Raha) यांनी, चहा उद्योगासमोरील सध्याचे संकट आणि विशेषतः दार्जिलिंग येथील चहा उत्पादन प्रक्रियेतील अडचणींचा पाढाच आम्ही समितीसमोर वाचून दाखवला असल्याचं म्हटलं आहे. 

व्हिडीओ पहा- 

दार्जिलिंग येथील चहा मळ्यांमधील चहाचे उत्पादन १२ लाख किलोंवरून ६ लाख किलोंवर आले आहे. दार्जिलिंग येथील चहाचे मळे हे संपूर्णतः डोंगराळ भागात आहेत. आहेत त्या चहा -बागांमध्ये पुनर्रोपण शक्य नाही, चहाच्या बागांचा विस्तार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाहीत, त्यात वाढता उत्पादन खर्च,  उत्पादन आणि मागणीत होणारी घट अशा अनेक समस्यामुळे चहा उद्योग क्षेत्र संकटात सापडल्याचं रहा म्हणालेत. 

पुनर्रोपणानंतर उत्पादन हाती यायला ५ ते ७ वर्षे जावी लागतात. या काळात या बागांमधून कसलंच उत्पन्न होत नाही. त्यामुळंच आम्ही केंद्राकडे स्पेशल पॅकेज मागत आहोत.

व्हिडीओ पहा-   

दार्जीलिंगच्या बागांमधून चहाचं उत्पादन घेताना उत्पादन खर्चात वाढ होते आहे, मात्र चहा बाजारात दार्जिलिंगच्या उत्पादनाचे (Darjeeling yields) भाव घसरत आहेत, २०२६-२०२१ दरम्यान दार्जिलिंग चहाचे दर सातत्याने घटत आहेत.  नवं उत्पादन हाती येईपर्यंत या बागा कशा सांभाळायच्या ?  उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळत नसेल तर या उद्योगाचं कसं होणार ? पर्यायानं या चहा मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचे भवितव्य काय? असे अनेक प्रश्न आम्ही  समितीसमोर मांडल्याचे रहा म्हणालेत.    देशांतर्गत मागणीतही वाढ होत नाही आणि निर्यातीचे चित्रही फारसे आशादायक नाही, त्यामुळेच आम्ही दार्जिलिंगसह चहा उद्योग क्षेत्राच्या अस्तित्व टिकवण्यासाठी स्पेशल पॅकेजची मागणी करत आहोत, याशिवाय पूर्वीसारखी चहा उत्पादनासाठी अनुदान देण्याची पद्धत पुन्हा सुरु करण्यात यावी, असा आग्रह इंडियन टी असोसिएशनच्या  (Indian Tea Association)  अध्यक्ष नयनतारा पालचौधुरी यांनी यावेळी संसदीय समितीकडे केलीय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT