संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

 कांदा लिलाव पुन्हा खुल्या पद्धतीने; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी निर्णय

टीम अॅग्रोवन

नाशिक  : जिल्ह्यात ‘कोरोना’ची पार्श्वभूमी बघता होणारी गर्दी तसेच मजूरटंचाईमुळे बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या कांदा लिलावात अडचणी येत होत्या. हा तिढा सोडवण्यासाठी बाजार समित्यांनी तोडगा काढत गोणी पद्धतीने कांदा लिलावाला सुरुवात केली. मात्र त्यास शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागल्याने पुन्हा लिलाव खुल्या पद्धतीने सुरू झाले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गौतम बलसाने यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. 

गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना प्रतिगोणीमागे ४० रुपये अतिरिक्त खर्च तसेच वेगळी मजुरी द्यावी लागत असे. त्यामुळे प्रतिक्विंटलमागे १०० रुपयांपेक्षा खर्च वाढूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने पणन संचालकांकडे खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी विचारत घेत खुल्या पद्धतीने कांदा लिलाव सुरू झाले आहे. मात्र, दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. 

जिल्ह्यातील बाजार समित्यांनी खुल्या पद्धतीने कांदा लिलाव करण्याचे स्वीकारले आहे. मात्र लासलगाव बाजार समितीने मजूर टंचाईचे कारण देत मंगळवारपर्यंत(ता.१४) गोणी पद्धतीने लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव बाजारसमितीतही लवकरच खुल्या पद्धतीने लिलाव करावा अशी कांदा उत्पादकांची मागणी आहे.  नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव खुल्या पद्धतीने करण्याचे निर्णयाचे स्वागत आहे. मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरून गोणी पद्धतीने लिलावाचा निर्णय नको. यासाठी शेतकऱ्यांना विचारात घ्यायला हवे, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT