संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर ! पहिलाच प्रयोग...

Vinod Ingole

वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत त्याआधारे कापसाला दर देण्याचा देशातील पहिला प्रयोग हिंगणघाट बाजार समितीच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. सध्या कापसात ३३ टक्‍के रुई प्रमाण मानत दर ठरविले जातात. परंतु, रुईची टक्‍केवारी काढून दर ठरविल्यास शेतकऱ्यांना क्‍विंटलमागे २०० ते ४०० रुपये वाढीव दर मिळणे शक्य होणार आहे.  

२०१५-१६ मध्ये कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेऊन दर देण्याचा पहिला प्रयोग वर्धा जिल्ह्यात करण्यात आला होता. त्या वेळी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. ३७ ते ४२ टक्‍के कापसाचे प्रमाण कापूस वाणात होते. हाच धागा पकडत कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे प्रशांत मोहता, ओम दालिया, केंद्रीय कापूस औद्योगिक संशोधन संस्थेचे (सीरकॉट) डॉ. सुजीतकुमार  शुक्‍ला, ॲग्रोप्लस फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद वैराळे यांनी राज्यात कापूस व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवावा अशी विनंती या बाजारसमितीकडे केली होती.

त्यानंतर हिंगणघाट बाजार समितीचे संचालक ओम दालिया यांनी हा प्रस्ताव संचालक सभेत मांडला. त्याला संचालक मंडळाने संमतीही दिली. मात्र, याकरिता सिरकॉटने यंत्रांचा पुरवठा करावा, अशी अट घालण्यात आली. सिरकॉटने याला मान्यता दिल्याने हा प्रकल्प मार्गी लागला आहे. डिसेंबरअखेर देशातील अशाप्रकारचा पहिला प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याकरिता शनिवारी (ता.७) हिंगणघाट बाजार समितीत तीन मिनी जिनिंग यंत्रे बसविण्यात येतील. हे यंत्र अवघ्या एक अश्वशक्तीवर चालतात. त्यांची किंमत ६० हजार रुपये आहे. एका मशिनव्दारे तासाला १५ नमुने घेता येणार आहेत. 

रुईचे प्रमाण असे मोजतात

एक किलो कापूस जिनिंग केल्यास त्यातून ३४ किलो रुई आणि ६६ किलो सरकी मिळते. रुईचा दर १२० रुपये किलो तर सरकीचा दर अवघा २० रुपये किलो आहे. त्यामुळे एक टक्‍का जरी रुईचे प्रमाण वाढले तर सरासरी १०० रुपये वाढीव मिळतील.

कापूस दरासाठी याचा होतो विचार धाग्याची लांबी, ताकद, तलमता आणि कापसातील आर्द्रता हे घटकच दर ठरविताना वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून विचारात घेतले जातात. रुईच्या टक्‍केवारीचा विचारच होत नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT