आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार 
मुख्य बातम्या

प्रश्न मार्गी लागतोय असे दिसताच भाजप आंदोलन करते ः आमदार रोहित पवार

टीम अॅग्रोवन

नगर  : दूध दराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. त्याबाबत बैठकाही झाल्या आहेत. राज्य सरकार याबाबत लवकरच धोरण ठरवणार आहे. मात्र, विषय मार्गी लागतोय असे दिसले की भाजप आंदोलन पुकारते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. केंद्र सरकार दूध पावडर आयात करीत आहे. त्यावरही भाजप नेत्यांनी आंदोलन करताना बोलावे, असेही ते म्हणाले.   

नगर येथील जिल्हा रुग्णालयाला आमदार पवार यांनी भेट देत ‘कोरोना’चा आढावा घेतला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. पवार म्हणाले, एखादा विषय मार्गी लागण्याच्या स्तरावर असेल, तेव्हा भाजप आंदोलन करीत असते. ही भाजपची सवय आहे. भाजपचे जे नेते महाराष्ट्रात आंदोलन करतात ते केंद्र सरकार दूध पावडर आणत आहे म्हणून कधी आंदोलन करणार, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारबाबत भाजपने काळजी करू नये. राज्य सरकार लोकहिताचे असून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करीत आहे, असे श्री. पवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT