टोमॅटो पिकावर झालेला जीवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव
टोमॅटो पिकावर झालेला जीवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात टोमॅटोवर आता जिवाणूजन्य करपा

Santosh Munde

औरंगाबाद: आधी मर रोगामुळे आणि आता जिवाणूजन्य करप्याने औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार करपले आहे. अनेक शेतकऱ्यांना आधी लागवड केलेली टोमॅटोची रोपे मर रोगामुळे मुळे मोडून पुन्हा लावण्याची वेळ आली. वातावरणामुळे पीक कीड-रोगांच्या विळख्यात सापडल्याची माहिती टोमॅटो उत्पादकांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद व गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. साधारणतः ऑगस्टच्या मध्यापासून उत्पादित टोमॅटोची गंगापूर व औरंगाबाद तालुक्यातून राज्यात व राज्याबाहेर विक्री सुरू होते. यंदा मात्र टोमॅटो उत्पादनाची वाट अवघड बनली आहे. आधी प्रतिकूल वातावरणामुळे टोमॅटो आगारात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. तर आता मोठ्या प्रमाणात जिवाणूजन्य करपा तोडणीस तयार असलेल्या टोमॅटोचे नुकसान करत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या लागवडीपैकी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत जिवाणूजन्य करप्यात प्रादुर्भाव झाला आहे. 

गंगापूर तालुक्यातील देरडा येथील टोमॅटो पिकाच्या पानावर, फांद्यांवर व फळांवर करप्याचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर माळीवडगाव येथील संदीप गवळी यांच्या टोमॅटोचीही हीच अवस्था झाल्याची बाब समोर आली होती. आता कन्नड तालुक्यातील माटेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातही जिवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पिकावर जिवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव असल्याची माहिती टोमॅटो उत्पादक शेतकरी व तज्ज्ञांनी दिली.

यामुळे येतो जिवाणूजन्य करपा हा रोग क्लॅव्हीबॅक्टर मिचिगॅनेसीस या जिवाणू मुळे होत असल्याची माहिती औरंबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी दिली. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की हा प्रादुर्भाव फोफावतो. भविष्यात हा रोग टाळण्यासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद निर्मित द्रवरूप ट्रायकोडर्मा प्लस या जैविक घटकात रोपे बुडवून टोमॅटोची लागवड करावी, सल्ला शास्त्रज्ञ डॉ जगताप यांनी दिला.

असा होतो परिणाम जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पानावर व फांद्यांवर झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. अन्न निर्मिती होत नाही. परिणामी उत्पादन कमी होते. फळांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळांची प्रत खराब होऊन गुणवत्ता कमी होते. परिणामी बाजारभाव कमी मिळतो.

प्रतिक्रिया जिवाणूजन्य करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून (प्रमाण नॅपसॅक पंपासाठी) फवारणी करावी. - डॉ. गजेंद्र जगताप, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, ‘एनएआरपी’ औरंगाबाद.

आधी मर रोगामुळे दीड एकर टोमॅटो मोडावा लागला. आता करपा सतावतो आहे. यंदा टोमॅटो उत्पादनासाठी आत्तापर्यंत अनुकूल वातावरणच राहिले नाही. पुढे काय होईल ते माहीत नाही. - संदीप गवळी, टोमॅटो उत्पादक, माळीवडगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT