आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे 
मुख्य बातम्या

आई ‘आयसीयू’मध्ये, तरी आरोग्यमंत्री झटताहेत जनतेसाठी...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  ः ‘कोरोना’चा शिरकाव आता महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र या सगळ्यात एक व्यक्ती सतत राज्याच्या जनतेला माहिती देण्याचं आणि ‘कोरोना’ला राज्यात येण्यापासून रोखण्याचं काम करत आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे गेल्या वीस दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती आहेत. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील जनतेसाठी झटताना पहायला मिळत आहेत.  

राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे महाराष्ट्रात कोरोना पसरू नये यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. श्री. टोपे यांनी नुकतीच विमानतळावर जाऊन प्रवाशांच्या क्रिनिंग व्यवस्थेची पाहणी केली. श्री. टोपे वेळोवेळी माध्यमांशी संपर्क साधत आहेत. रुग्णालयांत जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेत आहेत. कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांची पाहणी करत आहेत. तसंच ते राज्याच्या जनतेला योग्य मार्गदर्शन करीत आहेत. मात्र या सगळ्यात स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठीही श्री. टोपे यांच्याकडे वेळ नाहीये. स्वतःची आई रुग्णालयात असूनही त्यांना आपल्या आईच्या प्रकृतीची विचारणा करायला पुरेसा वेळ मिळू शकत नाहीये.   

बॉम्बे हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरू आहेत. मात्र राज्यभरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे श्री. टोपे यांना त्यांच्या मातोश्रींना पुरेसा वेळ देता येत नाहीये. 

याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने राजेश टोपे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना श्री. टोपे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले. ‘‘शरद पवार यांनी किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी केलेले काम माझ्यासाठी आदर्श आहे’’, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. 

डॉक्‍टर आणि परिचारिकांचे मानले आभार आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे यांच्‍यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. टोपे यांनी रुग्‍णालयातील रुग्णांची सद्यःस्थिती जाणून घेतली. त्‍यांना आवश्‍यक त्‍या सोयीसुविधा देण्‍याबाबत सूचना केल्‍या. रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिका उत्तम सेवा देत असल्‍याबद्दल श्री. टोपे यांनी त्‍यांना धन्‍यवाद दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT