संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगलीतील ६७ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग

टीम अॅग्रोवन

सांगली  : जिल्ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेत पिके विमा संरक्षित केली आहेत. जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी शुक्रवारी (ता.३१) अंतिम मुदत होती. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली होती. ‘कोरोना’मुळे असलेले लॉकडाउन आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब लागत असल्याने  विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तसेच ग्रामीण भागात जनता कर्फ्यु लागू केला होता. परिणामी नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठीच घराबाहेर पडता येत होते. पीक विम्यासाठी कागदपत्रे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांना संबंधित विभागांकडे हेलपाटे मारावे लागले.

गुरुवारी (ता. ३०) जिल्ह्यातील लॉकडाउन संपला. त्यानंतर शेतकरी पीक विमा भरण्यासाठी बाहेर पडू लागले. गेल्या दोन दिवसांत जिल्हा बँकेत विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत होती. जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यास ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याने बँकेच्या कामाचे नियोजन बदलण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी खरीप हंगामात सुमारे १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. यंदा खरीप हंगामात शुक्रवार अखेर ६७ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असून एकूण ७७ ते ८० हजार शेतकरी या विम्यात सहभागी होतील असा अंदाज संबंधित विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. विमा भरण्यासाठी येणा़ऱ्या अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे विमा भरण्यासाठी मुदतवाढ  द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

प्रतिक्रिया पीक विमा भरण्यासाठी ‘कोराना’मुळे अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी. तरच आम्हाला विमा भरता येईल. - पोपट माने, आरग, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT