किसनवीर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार
किसनवीर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार 
मुख्य बातम्या

किसनवीर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील कृषिक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०१८ या वर्षाचे पुरस्कार सोमवारी (ता. २६) जाहीर झाले. सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला, तर ‘अॅग्रोवन’मधील चकाट्या या सदराचे व्यंगचित्रकार लहू काळे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रतिष्ठानचे सचिव अॅड. विनयकुमार पटवर्धन, विश्वस्त मुश्ताक अंतुले आणि दीपक जयंतराव पाटील यांनी पुरस्कारांची घोषणा केली. येत्या १ जुलै रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०१८ चे मानकरी असे आहेत. 

  •  सामाईक पुरस्कार - किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना (भुईंज, ता. वाई, सातारा) अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले.  
  • कृषी पुरस्कार - अरुण निंबाजी देवरे (मु. पो. दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक)  
  • कृषी प्रक्रिया पुरस्कार - कु. नेहा दत्तात्रेय घावटे (मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे)  
  • कृषी साहित्य पुरस्कार - डॉ. एस. जी. बोरकर (सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  
  • कृषी पत्रकारिता पुरस्कार - लहू काळे (उंड्री, पुणे)  
  • कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार - प्रवीण रामनाथ संधान (माॅन्सून फूड्स, मु. चिंचखेड, ता. जि. नाशिक)  
  • फलोत्पादन पुरस्कार - धीरज एस जुंधारे (मु. हाटला, ता. काटोल, जि. नागपूर)  
  • भाजीपाला उत्पादन - श्रीमती राहिबाई पोपेरे (मु. कोंभाळणे, ता. अकोले, जि. अहमदनगर)  
  • फुलशेती - महेश रघुनाथ धुम (मु. गरदवाडी, ता. जव्हार, जि. पालघर)  
  • सामाजिक वनीकरण - अजित वर्तक (महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, शनिवार पेठ, पुणे)  
  • पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय - श्रीमती काशीबाई मोरे (ता. मुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)  
  • जलसंधारण - मिलिंद तुकारामजी भगत (सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा)  
  • पर्यावरण - संजय पाटील (बायफ, मित्र रिसर्च फाउंडेशन, वारजे, पुणे).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

    Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    SCROLL FOR NEXT