शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी अनुदान
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी अनुदान 
मुख्य बातम्या

शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी अनुदान

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पणन मंडळाने सुरू केलेल्या हवाई वाहतूक अनुदान याेजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. हवाईबराेबर आता जहाजाद्वारे निर्यातीबराेबरच आंतरराज्य शेतमालाच्या रस्ते वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार ही याेजना राबविण्यात येत आहे. ही याेजना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनाच लागू असणार आहे.   याबाबतची माहिती देताना पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, की राज्यातील शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या वतीने शेतमाल वाहतूक अनुदान याेजना राबविण्यात येत आहे. यासाठी विमान वाहतूक अनुदान याेजना सुरू झाली असून, मिझाेराममध्ये पुढील महिन्यात नाशिक येथून डाळिंब आणि कांदा पाठविण्यात येणार आहे. या याेजनेबराेबच समुद्रामार्गे शेतमाल निर्यातीसाठी प्रतिकंटनेर ३० हजार रुपयांचे अनुदान जास्तीत जास्त एक लाख रुपये दिले जाणार आहे; तर रस्ते वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देण्याचे विचाराधिन असून, यासाठी ५०० किलाेमीटरच्या अंतराची अट ठेवण्यात येणार आहे.   

देश   शेतमाल 
अमेरिका     आंबा, डाळिंब 
आॅस्ट्रेलिया आंबा डाळिंब
साऊथ काेरिया     केळी, आंबा 
कजाकिस्तान   आंबा 
अफगाणिस्तान  केळी, कांदा 
इराण    केळी, संत्रा आंबा 
रशिया    केळी, आंबा 
मॉरिशस  कांदा, आंबा 
लॅटव्हीया भाजीपाला व कांदा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT