माॅन्सून
माॅन्सून 
मुख्य बातम्या

माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती

टीम अॅग्रोवन

पुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार होत आहे. दोन ते तीन दिवसांत माॅन्सून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.   कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पोषक वातावरण नसल्यामुळे ९ जूननंतर तर मराठवाडा व विदर्भात ११ जूननंतर माॅन्सून पुढे सरकलेला नव्हता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून माॅन्सूनसाठी पोषक हवामान तयार होत आहे. माॅन्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरवात झाली आहे. दोन-तीन दिवसांत तो मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वी माॅन्सून ठाणे, नगर, बुलढाणा, अमरावती, गोंदिया या भागात दाखल होता, तीच स्थिती अजूनही कायम आहे.

सध्या महाराष्ट्र ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून कोकणाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेश, हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर असून माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी ही स्थिती अनुकूल आहे. तसेच उत्तर प्रदेश ते हिमालय, पश्चिम बंगाल या भागातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माॅन्सून पुढे सरकण्याची शक्यता असून छत्तीसगड, उडिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, बिहार, मध्य प्रदेशच्या काही भागात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT