दुध
दुध  
मुख्य बातम्या

मदर डेअरीकडून दूध दरात साडेचार रुपयांनी कपात

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेला मदर डेअरीचा प्रकल्प अाता दूधउत्पादकांना कमी दर देत असल्याने चर्चेत अाला अाहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून अातापर्यंत चारवेळा भाव कमी करण्यात अाला आहे. अाता गायीच्या दुधाचा भाव २३ रुपयांपर्यंत खाली अाला अाहे. पूर्वी हाच दर २७ रुपये ५० पैसे पडत होता, असे दूध उत्पादकांचे म्हणणे अाहे. लिटरमागे साडेचार ते पाच रुपयांचा फटका दूध उत्पादकांना सहन करावा लागत असून वाढलेल्या खर्चाचा ताळेबंद जुळविताना दूधउत्पादक हवालदिल बनला अाहे.   विदर्भात दुग्धव्यवसाय सध्या कमकुवत अाहे. त्यातही शेतकरी अात्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तर बिकट स्थिती अाहे. या शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीला प्रोत्साहन दिले जात अाहे. याचाच एक भाग म्हणून लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने या भागात मदर डेअरीने दूध संकलन सुरू केले. बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, नांदुरा या भागात मदर डेअरीच्या संकलनासाठी विविध केंद्र सुरू अाहेत. हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा गायीच्या दुधाचा (३.५ फॅट, ८.५ S/F) भाव २७ रुपये ५० पैसे मिळत होता असे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. अाता हाच दर २२ ते २३ रुपयांपर्यंत खाली घसरला. अाठ महिन्यांत चार वेळा दर कमी करण्यात अाले. शेतकऱ्यांकडून दर्जेदार दूध उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दर पाडले जात अाहेत. विशेष म्हणजे याचे कुठलेही कारण शेतकऱ्यांना सांगण्यात अालेले नाही.   वऱ्हाडात नांदुरा, मोताळा तालुक्यात दूग्ध व्यवसायाने चांगले पाय रोवलेले अाहेत. पूर्वी हे शेतकरी खासगी डेअरींच्या संकलन केंद्रांवर दूध घालत. नंतर मदर डेअरीचे संकलन केंद्र उघडल्यानंतर शेतकरी त्याकडे वळू लागले. अनेकांनी कर्ज काढून या संकलनाच्या विश्वासावर नवीन गायी खरेदी केल्या. सरकारी योजनांचा लाभ मिळेल, अापले उत्पन्न वाढेल अशी पशुपालकांना अाशा होती. परंतु, कर्ज काढून घेतलेल्या जनावरांवर अाता खर्च अधिक व उत्पन्न कमी असा पेच तयार झाला. त्यामुळे आता घेतलेले कर्ज फेडायचे  हा प्रश्न उभा राहला अाहे. मदर डेअरी बुलडाणा जिल्ह्यात संकलन केलेल्या दुधाचे मलकापूर एमअायडीसीमध्ये असलेल्या केंद्रात शीतकरण करून पुढील प्रक्रियेसाठी मुंबई, नागपूरला पाठविते. दुधाचे भाव कमी होत असताना कुठलीही संघटना, नेता याविषयावर अद्यापही बोलायला पुढे अालेला नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT