बागेतील संत्रा फळे चोरणाऱ्या टोळीस अटक
बागेतील संत्रा फळे चोरणाऱ्या टोळीस अटक 
मुख्य बातम्या

बागेतील संत्रा फळे चोरणाऱ्या टोळीस अटक

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः बागेतील संत्रा फळांची चोरी करून शेतकऱ्यांना जेरीस आणणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून दोन मालवाहू वाहनांसह संत्र्याचा ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साठ क्रेटमध्ये या दोन्ही वाहनांत संत्रा फळे ठेवण्यात आली होती.  जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतीमालाच्या चोरीत वाढ झाली होती. सोयाबीन, कापूस, विहिरीवरील कृषिपंप, केबल यांसह बागेतील संत्रा, मोसंबीची देखील चोरी होत होती. पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी याची गांभीर्याने दखल घेत चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाकाबंदी व रात्रगस्तीकामी तैनात करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयीत चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१६ वाय ८२३१) तपासणी करण्यासाठी थांबविले. चालकाची चौकशी केली असता त्यात संत्रा फळे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आली. अमरावतीला विक्रीकामी संत्रा नेत असल्याचे चालकाने सांगीतले. मात्र संत्रा कोठून आणला याबाबत त्याला सांगता आले नाही. त्यामुळे संशय बळावलेल्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. त्या वेळी समरसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून संत्रा फळे चोरल्याची बाब समोर आली. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनात देखील चोरीची संत्री असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाहन (क्र.एम.एच.३१ सीएन-४८८६) थांबवून त्याची पण चौकशी केली. याप्रकरणी टोळीच्या प्रमुखासह तब्बल ९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात शाह मोहम्मद शाह, सलीम शाह अयुब शाह, इमरान खान किफायत खान, कलीम शाह अयुब शाह, वारीस बेग जब्बार बेग, फारुक अली सादीक अली, शेख हाफीज शेख हारुण, शेख हारुण शेख मुनाफ, इरफान शाह मोहम्मद शाह, अशी अरोपींची नावे आहेत. अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील किनगे, नरेंद्र पेंदोर, मुलचंद भांबूरकर, पोलिस हवालदार सुनील तिडके, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे, निलेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT