यंत्राद्वारे रोमिनी पिकाची काढणी.
यंत्राद्वारे रोमिनी पिकाची काढणी. 
मुख्य बातम्या

भाजीपाला शेतीमध्ये वाढतोय रोबोचा वापर

कोजेन्सिस वृत्तसेवा

अमेरिकेतील शेतकऱ्यांचे पीक लागवड क्षेत्र मोठे असल्याने त्यांना पीक लागवड ते काढणीपर्यंत कुशल मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी पीक व्यवस्थापनामध्ये रोबोच्या वापराला प्राधान्य देत आहेत.  

कॅलिफोर्निया भागात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागात प्रामुख्याने रोमिनी आणि पालकाची मोठ्या प्रमाणात लागवड असते. या भागातील शेतकरी मजूर टंचाईमुळे लागवड, आंतरमशागत ते अगदी पालेभाजी काढणी, पॅकिंगसाठी रोबोच्या वापराकडे वळले आहेत. रोबोच्या वापरामुळे जास्तीत जास्त क्षेत्रावरील ताज्या भाजीपाल्याची काढणी करणे शक्य होत आहे. रोबोच्या बरोबरीने इतर मशागतीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी यंत्रांचा वापर करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागत, फवारणी आणि काढणीसाठी देखील गरजेनुसार विविध यंत्रांची उपलब्धता झाली आहे. कॅलिफोर्नियातील टेलर फार्ममध्ये सध्या ९५ टक्के शेतीमधील कामे ही यंत्राच्या माध्यमातून केली जातात. रोबो तंत्रज्ञानामुळे कमी मनुष्यबळामध्ये मोठ्या क्षेत्रातील सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण करणे येथील शेतकऱ्यांना सहज शक्य होत आहे. तसेच येथील मजुरांची कुशलता आणि कार्यक्षमता देखील वाढली आहे.  रोबोच्या वापरामुळे वेळेची बचत झाली, त्याचबरोबरीने पीक उत्पादनातही चांगल्या प्रकारे वाढ झाल्याचे येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. मशागत, काढणी आणि भाजीपाला पॅकिंगची गती दुप्पट झाली आहे. केवळ पिकांची आंतरमशागत आणि काढणीपुरते रोबो तंत्रज्ञान मर्यादित न राहाता आता भाजीपाला प्रतवारी आणि पॅकेजिंगमध्ये सुद्धा वापरले जात आहे.  भाजीपाला पिकांच्याबरोबरीने इतर पिकांच्या व्यवस्थापनात रोबो तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत येथील शेतकरी प्रयोग करत आहेत.त्यांच्या प्रयत्नांना चांगले यशही मिळू लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT