बुलडाण्यात चारा छावणी उघडण्यास मुहूर्त मिळेना
बुलडाण्यात चारा छावणी उघडण्यास मुहूर्त मिळेना 
मुख्य बातम्या

बुलडाण्यात चारा छावणी उघडण्यास मुहूर्त मिळेना

टीम अॅग्रोवन

बुलडाणाः जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे अधिक हाल होत आहेत. प्रामुख्याने खामगाव, नांदुरा तालुक्यांतील जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने केली जात होती. परंतु अद्यापही चारा छावणी सुरू करण्याच्या अनुषंगाने कुठलाही निर्णय प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे मे महिना अंतिम टप्प्यात आलेला असताना चारा छावणीबाबत काहीही झालेले नाही.  बुलडाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्यावर्षी दुष्काळी परिस्थिती बनलेली आहे. या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. कुठल्याच प्रकल्पात पाणी पुरेशा प्रमाणात शिल्लक नाही. चाऱ्याचाही प्रश्न वाढलेला आहे. खामगाव तालुक्यातील वाकूड भागात चारा छावणी उघडावी यासाठी तेथील सरपंचासह नागरिकांनी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आठवडाभर आंदोलन केले. तहसीलदाराच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासन जागेवरून हलले. चारा छावणीसाठी २० मेपर्यंत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर यंत्रणा पुन्हा निवडणुक मतमोजणीत अडकल्या होत्या. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या मागणीवर पडला. अद्याप चारा छावणी सुरु करण्याबाबत कुठलाही लेखी आदेश निघालेला नाही. सध्या जनावरांची होरपळ सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणांकडून हा प्रश्न तितक्या गांभीर्याने हाताळला जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मे महिना संपायला आला तरी छावणी सुरू झाली नाही. पाऊस या वर्षी लांबण्याची चिन्हे असल्याने चाराटंचाईचा प्रश्न आणखी दोन ते अडीच महिने भेडसावू शकतो, असे शेतकरी सांगतात. अशा स्थितीत जनावरांची सोय करण्यासाठी चारा छावणी तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने केली आहे.

चारा छावणीचा निर्णय सोमवारी शक्य ः कैलास फाटे  तालुक्यातील जनावरांची चारा व पाण्याची समस्या पाहता आम्ही सातत्याने चारा छावणीची मागणी लावून धरली. प्रशासनाने प्रस्ताव मागविले. पारखेड व वाकूड परिसरात चारा छावणी उघडली जाण्याची शक्यता आहे. याबाबत आपण स्वतः निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला असून त्यांनी लवकरच निर्णयाचे आश्वासन दिले. सोमवारी (ता. २७) याबाबत आदेश काढले जाण्याची शक्यता आहे. मुक्या जनावरांचा प्रश्न पाहता प्रशासनाने दिरंगाईचे धोरण सोडून द्यावे व छावणी उघडावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT