गडचिरोली जिल्ह्यात केवळ ३२ टक्‍के पीक कर्जवाटप
गडचिरोली जिल्ह्यात केवळ ३२ टक्‍के पीक कर्जवाटप 
मुख्य बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात केवळ ३२ टक्‍के पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

गडचिरोली ः जून महिना संपल्यानंतरही बॅंकांकडून पीककर्जाची गती वाढविण्यात आली नाही. परिणामी, जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ ३२ टक्‍केच कर्ज वितरण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने बॅंकांविरोधात भूमिका घेत कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर धान लागवड होते. त्याकरिता शेतकरी बॅंकेकडून पीककर्जाची उचल करतात. सहकारी बॅंकेला या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १५७ कोटी ७० लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी आत्तापर्यंत १२ हजार ५९१ शेतकऱ्यांना ४९ कोटी  ३३ लाख रुपयांच्या कृषी कर्जाचे वाटप झाले आहे. तीन दिवसांपूर्वीच्या कर्जवाटपाची ही टक्‍केवारी आहे. कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंका नेहमीप्रमाणे पिछाडीवर आहेत. या बॅंकांना एकूण कर्जवाटपाच्या उद्दिष्टांपैकी ७० कोटी ६७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी यांनी १०.५२ टक्‍के म्हणजेच ८ कोटी १७ लाख रुपयांचेच कर्जवाटप केले आहे. त्यातही युनियन बॅंक ऑफ इंडिया २३.९६ टक्‍के कर्जवाटपासह आघाडीवर आहे. विजया बॅंक, कॅनरा बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांनी एक टक्‍काही उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. खासगी बॅंकांमध्ये ॲक्‍सिस बॅंकेने २० टक्‍के, तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने २७.७४ टक्‍के उद्दिष्ट गाठले आहे. 

‘शेकाप’चा आंदोलनाचा इशारा जिल्ह्यात खरीप पीककर्ज वितरणात बॅंकांची पीछेहाट झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री वेळदा यांनी दिला आहे. कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी शेतकऱ्यांना त्रास झाल्यास अथवा विलंब झाल्यास आंदोलन केले जाणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT