शिवारफेरी प्रारंभ
शिवारफेरी प्रारंभ 
मुख्य बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीला प्रारंभ

टीम अॅग्रोवन

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षी होणाऱ्या तीनदिवसीय शिवारफेरीला मंगळवारी (ता. ५) सुरवात झाली. कुलगुरू डॉ. विलास भाले आणि शिवारफेरीसाठी प्रथम नोंदणी करणारे शेतकरी वासुदेव राऊत (रा. कौलखेड) व महिला शेतकरी दुर्गाताई टावरी( तेल्हारा) यांच्या हस्ते फीत कापून उद्‍घाटन झाले.  विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही शिवारफेरी नवीन तंत्र, यंत्र, वाण, संशोधनाची माहिती देणारी असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कारणामुळे  ऑक्टोबरमध्ये घेतली जाणारी ही शिवारफेरी या वर्षी आता ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान होत आहे. दररोज सकाळी शिवारफेरीमध्ये प्रक्षेत्र भेट आणि दुपारी ४ ते ५ दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.  शिवारफेरीच्या उद्‍घाटन कार्यक्रमाला विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर, प्रगतिशील शेतकरी अप्पाजी गुंजकर, शेतकरी कीर्तनकार महादेवराव भुईभार, मोहन जगताप, नामदेवराव अढाऊ, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्रे नागदेवे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. ययाती तायडे यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. शिवारफेरीच्या पहिल्या दिवशी अकोल्यासह बुलडाणा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता.  शिवारफेरीच्या वाहनाला हिरवी झेंडी दर्शविल्यानंतर कुलगुरूंसह शेतकऱ्यांनी उद्यानविद्या विभागाला भेट देऊन सुरवात केली. या ठिकाणी फळे, रोपे, भाजीपाला या संदर्भात माहिती घेतली. प्रामुख्याने फळझाड रोपांचे कलमीकरण, नवनवीन जाती, फळांवरील प्रक्रिया आदींबाबत माहिती घेतली. शेतकरी या प्रक्षेत्रांना देत आहेत भेटी उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती, कापूस संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प (फळे), ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, कडधान्य संशोधन केंद्र, तेलबीया संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजारे प्रदर्शन, नागार्जुन वनौषधी उद्यान व दुग्धशास्त्र विभाग येथे देशी गायींचे दालन. शिवारफेरीत आज आणि उद्या सहभागी होणारे जिल्हे बुधवार (ता. ६)ः     चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया  गुरुवार (ता. ७)ः     यवतमाळ, वर्धा व गडचिरोली   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT