अवकाळीमुळे पिकांचे नुकसान Crop damage due to unseasonal rains
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान Crop damage due to unseasonal rains 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात अवकाळीमुळे पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नगर : नगर जिल्ह्यातील काही भागात शनिवारी (ता. २०) सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट झाली. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभऱ्यासह अन्य शेतीपिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी केली जात आहे. 

दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी पाथर्डी तालुक्यातील साकेगाव, पागोरी पिंपळगाव, कळसपिंप्री, कोरडगाव, कोळसांगवी, सोनोशी, तोंडोळी, निपाणी जळगाव, भुतेटाकळी, येळी, मोहज देवढे, चितळी, पाडळी येथे मोठ्या प्रमाणात गारांचा तडाखा बसला. आंब्यांच्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला होता. विजेचे खांब पडले. झाडे उन्मळून पडली. शहरातील कोरडगाव रस्त्यावर स्मशानभूमीतील झाड ट्रॅक्‍टरवर पडले. मोहोज देवढे (रुपनरवाडी) येथील अर्जुन रुपनर यांचा चार एकर ऊस विजेची तार तुटून पेटला. 

नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. तब्बल तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. काही काळ जोरदार गारपीट झाली. कुकाणे, जेऊर हैबती, तरवडी, देवगाव, देडगाव, चांदे, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, कौठे, नजीक चिंचोली, भेंडा आदी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. राहुरी तालुक्यातील कोळेवाडी, चिखलठाण, वावरथ, जांभळी आदी भागात जोरदार पाऊस, गारपीट झाली.

संगमनेर तालुक्यातील खांबे, शिंदोडी, खंडेरायवाडी, कोठेमलकापुर, रणणखांबवाडी आदी गावांच्या शिवारात जोरदार पाऊस व गारपीट झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर, पारनेर तालुक्यातील काही गावांतही पाऊस व गारपीट झाली. या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, हरभरा व भाजीपाला आणि फळपीकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT