उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान 
मुख्य बातम्या

उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान

टीम अॅग्रोवन

पुणे : मालदीव ते उत्तर महाराष्ट्र या दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकत आहे. तसेच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर या भागातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात ढगाळ हवामान असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंशापर्यत वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरडे हवामान आहे, तर उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीची तिव्रता चांगलीच कमी झाली आहे. गोव्यासह, संपूर्ण राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी (ता.15) सकाळी आठ वाजेपर्यत विदर्भातील गोंदिया येथे 10. 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ हवामान होते. येत्या शुक्रवार (ता.18) पर्यत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता.20) पर्यत आकाश मुख्यत निरभ्र राहील.

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशापर्यत वाढ झाली आहे. भिरामध्ये 19.5 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली. नगरमध्ये 15.0 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोद झाली. मराठवाड्यातील किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली. उस्मानाबादमध्ये 13.9 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यत वाढले आहे. गोंदिया पाठोपाठ चंद्रपूरमध्ये सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

सोमवारी (ता.15) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) मुंबई (सांताक्रूझ) 21.0 (4), अलिबाग 22.4 (4), रत्नागिरी 21.0 (2), भिरा 19. 5 (4), डहाणू 21.3 (5), पुणे 16.2 (5), नगर 15.0 (3), जळगाव 14.4 (3), कोल्हापूर 19.5 (1), महाबळेश्वर 17.0 (4), मालेगाव 18.2 (7), नाशिक 15.5 (5), सांगली 17.9 (4), सातारा 16.6 (4), सोलापूर 20.1 (4), औरंगाबाद 17.4 (6), परभणी शहर 18.4 (4), नांदेड 14.5 (1), उस्मानाबाद 13.9, अकोला 17.6 (3), अमरावती 17.6 (3), बुलढाणा 17.8 (3), चंद्रपूर 15.0, गोंदिया 10.5 (-3), नागपूर 16.4 (3), वर्धा 18.2 (5), यवतमाळ 19.4 (4)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT