हवामान अंदाज
हवामान अंदाज 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद दहा अंशांवर

टीम अॅग्रोवन

पुणे : उत्तरेकडून वारे वाहत असल्याने राज्यातील किमान तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. मराठवाड्यातील उस्मानाबादमधील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, शनिवारी (ता. 4) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे सर्वात कमी म्हणजेच दहा अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटला आहे. तर सोलापूर येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 6.2 अंश सेल्सिअसने घटला असून 13.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

त्यापाठोपाठ नगर आणि रत्नागिरी येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 4.1 आणि 4.1 अंश सेल्सिअसने घटले आहे. उस्मानाबादपाठोपाठ नाशिकमध्ये पुण्यातील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 3.3 अंश सेल्सिअसने घटल आहे. तर पुण्यात 12.5 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 12.6 तर, नगरमध्ये 12.8 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. राज्यातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पाराही एक ते दोन अंश सेल्सिअसने घटला आहे.

सध्या मुंबई, औरंगाबाद, रत्नागिरी अकोला येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही गुरुवार (ता.9) पर्यत आकाश अंशत ढगाळ राहील. राज्यात येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागली आहे. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागली असल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जोर धरू लागली आहे. शनिवारी (ता. 4) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई 23.8, सांताक्रुझ 21.0, अलिबाग 20.8, रत्नागिरी 18.7, डहाणू 20.2, भिरा 17.0, पुणे 12.5, नगर 12.8, जळगाव 15.2, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 15.4, नाशिक 12.6, सांगली 17.1, सातारा 15.0, सोलापूर 13.1, उस्मानाबाद 10.0, औरंगाबाद 14.8, परभणी 14.0, नांदेड, बीड, अकोला 15.7, अमरावती 17.4, बुलढाणा 16.6, ब्रम्हपुरी 15.8, चंद्रपूर 17.2, गोंदिया 15.2, नागपूर 14.6, वाशिम 14.8, वर्धा 15.8, यवतमाळ 15.0  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT