पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी, PM Narendra Modi 
मुख्य बातम्या

आम्ही अडचणीच्या भिंती तोडत आहोत : पंतप्रधान मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क 

नवी दिल्लीः आतापर्यंत आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी कायद्यांच्या रूपाने फक्त भिंती उभ्या केल्या गेल्या. आता त्या भिंती व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. १२) आपल्या सरकारच्या नव्या कृषी कायद्यांची पुन्हा पाठराखण केली. ‘फिक्की’च्या ९३ व्या वार्षिक परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन करताना पंतप्रधान बोलत होते. कोरोना काळात ज्या वेगाने परिस्थिती बिघडली होती, त्याच वेगाने आता ती लक्षणीयरित्या सुधारत आहे, असेही त्यांनी नमूद केले.  कृषी कायद्यांच्या विरोधात गेले सतरा दिवस दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे मागे घ्या, या एकमेव मागणीवर शेतकरी ठाम आहेत.  पंतप्रधानांनी त्याच कायद्यांची पाठराखण केल्याने आंदोलनात तातडीने तोडगा निघण्याची शक्‍यता आणखी अंधूक झाली आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील व त्यांना याचा फायदा होईल असे सांगून मोदी म्हणाले की देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा व शेतकरी समृध्द झाला की देशही समृध्द व्हावा यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत.  कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा, शीतगृहे, अन्नप्रक्रिया उद्योग या साऱ्या बाबतीत केवळ भिंती उभ्या केल्या गेल्या होत्या. आम्ही त्या तोडण्याचे, साऱ्या अडचणी दूर करण्याचेच काम करत आहोत, असेही मोदी  म्हणाले. 

   मोदी म्हणाले...  कृषी कायद्यांमुळे शेतकरी समृद्ध होईल   कृषीत गुंतवणूक वाढून चौफेर विकास   विदेशी गुंतवणूकदारांची भारताला पसंती   आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिक कटिबद्ध

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT