शेतीला ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागेल : प्रतापराव पवार
शेतीला ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागेल : प्रतापराव पवार 
मुख्य बातम्या

शेतीला ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागेल : प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतीमधून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोनाला आता आधुनिक ज्ञानाचे व्यावसायिक अधिष्ठान द्यावे लागणार आहे. गावपातळीवर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची ही जाणीव निर्माण होण्यासाठी शाळेत दिलेले कृषी शिक्षण उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.   पुणे येथील रावबहादूर नारायणराव बोरावके सेंटर फॉर अॅग्रीप्रेन्युअरशिपच्यावतीने उभारलेल्या राज्यातील पहिल्या कृषिकेंद्रित अभ्यासक्रमावर आधारित ''व्हर्च्युअल क्लासरूम'' व ''सायब्ररी''चे उद्घाटन करताना ते बोलत होते. कृषितज्ज्ञ उदय बोरावके यांच्या संकल्पनेतून चांबळी (ता. पुरंदर) येथील कृषी औद्योगिक विद्यालयात सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर ‘बायफ’चे विश्वस्थ व टाटा सन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर, उदय बोरावके, नीलिमाताई बोरावके, महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष भय्यासाहेब खैरे, सचिव संतोष जगताप, सरपंच हेमलता खटके होते. रावबहादूर बोरावके यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला.  श्री. पवार म्हणाले, ''आम्ही शेतकरी कुटुंबातून पुढे आलो आणि गावातील मारुती मंदिरात भरणाऱ्या शाळेत शिकत मेंढरं राखत वाढलो. शेतकऱ्यांना आता व्यावसायिक अंगानेच शेतीकडे पाहावे लागेल. त्यासाठी ज्ञान, माहितीच्या वाटेने जावे लागेल. अॅग्रोवन आम्ही त्या हेतूनेच सुरू केला आहे. उदय बोरावके यांनी कृषिज्ञानाचा हाच दृष्टिकोन ठेवत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. माझ्या मते राज्यासाठी हा उपक्रम अनुकरणीय आहे.''  संपर्क :  rbcap125@gmail.com (०२०-२६८१६६३०) येथे करता येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT