Various measures taken by the Manarkhed Gram Panchayat
Various measures taken by the Manarkhed Gram Panchayat 
मुख्य बातम्या

मनारखेड ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना 

टीम अॅग्रोवन

अकोला ः बाळापूर तालुक्यातील मनारखेड ग्रामपंचायतीने येथे कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सरपंच डॉ. सूरज पाटील (लोड) यांच्या अध्यक्षतेखाली गांव समिती स्थापन करून विविध उपक्रम हातात घेतले आहेत. 

मनारखेड येथे गांवबंदीसाठी गांव सीमेवर शिपाई नियुक्त करण्यात आला. मुंबई -पुणे येथून आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आपात्कालीन परिस्थितीसाठी विलगीकरण कक्ष स्थापन केला. पूर्ण गावातील नाल्यांची व गावसफाई करून तीन वेळा पंपाद्वारे फवारणी व ट्रॅक्टरद्वारे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. 

गरजू व भूमिहीन आणि दिव्यांग अशा एकूण १२५ कुंटुबांना घरपोच रेशन कीट वाटप करण्यात आली. प्रत्येक कुटुंबातील सदस्याला मास्क व प्रत्येक कुटुंबासाठी सॅनिटायझर घरपोच वाटप करण्यात आले. आरोग्य सेवक- सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस स्वच्छाग्रही यांना पीपीई कीट वाटप करण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले. 

तसेच दिव्यांग लोकांच्या खात्यात तीन हजार रुपये मदत देण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता देण्यात आला असून त्यांचा विमा सुद्धा काढण्यात आला. विविध उपक्रम सरपंच डॉ. पाटील, उपसरपंच गोपाळ दिवनाले, राजेश पाटील, शिवशंकर लोड, नितीन सुरशे, शरद दिवनाले, लता सुरुशे, अंबादास नागे, विनोद मेसरे, तंटामुक्त अध्यक्ष संतोष पाटील, पोलिस पाटील गणेश दिवनाले, सचिव सुधीर काळे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन वारूडकर राबवित आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT