सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले  Vaccination of livestock in Sangli stalled
सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले  Vaccination of livestock in Sangli stalled 
मुख्य बातम्या

सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले 

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार ५९३ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ७८ हजार ५०८ इतक्या जनावरांना घटसर्प, फऱ्या आंत्रविषार अशा साथींच्या रोगांचे लसीकरण केले आहे. अर्थात, ८ लाख २५ हजार ०८५ जनावरांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे लसीकरण कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न पशुपालक उपस्थित करू लागले आहेत.  जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ३ हजार ५९३ इतकी आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर या पशुधनांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले जाते.

पावसाळ्यात गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या  आणि शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषार असा साथीच्या रोगाचा फटका बसतो. यामुळे जनावरांना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग जनावरांना लसीकरण करण्याची  मोहीम मे महिन्यापासून सुरुवात करतात. प्रामुख्याने पूरग्रस्त भागात लसीकरणाला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली. परंतु लसीकरण करण्यास पशुसंवर्धन विभागाकडून गती नसल्याचे दिसते आहे. पावसाळा संपत आला तरी अजून लसीकरण झाले नाही.  जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी लाळ्या खुरकूत रोगाने थैमान घातले होते. जिल्ह्यात आतापर्यंत शंभरावर जनावरे दगावली होती. अशा स्थितीत लाळ्या खूरकूतच्या लसी अद्यापही जिल्ह्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लाळ्या खूरकूतचे लसीकरण रखडले असल्याचे चित्र आहे. लसी वेळेत आल्या नाही तर दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनांचे आरोग्य धोक्यात असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. 

पशुधन आकडेवारी  गाई ः ३ लाख २४ हजार ७५६  म्हशी ः ४ लाख ९३ हजार ९५८  शेळ्या ः ४ लाख ५४ हजार१२५  मेंढ्या ः १ लाख ३०, ७५४  एकूण ः ११ लाख ०३५९३  ऑगस्ट अखेर झालेले लसीकरण संख्या  घटसर्प...८९ हजार ९१४  फऱ्या...२७ हजार ००६  आंत्रविषार...१ लाख ५६ हजार ५८८   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT