सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेच्या गैरवापराद्वारे उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न : भुजबळ
सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेच्या गैरवापराद्वारे उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न : भुजबळ 
मुख्य बातम्या

सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेच्या गैरवापराद्वारे उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक  : देशात सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू अाहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत आहे. त्याद्वारे उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीतर्फे कॉँग्रेस कमिटी कार्यालय नाशिक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, श्रीराम शेटे, आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, दिलीप बनकर, जयवंतराव जाधव, नानासाहेब महाले, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ. तुषार शेवाळे, अॅड. रवींद्र पगार आदी उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, सध्या देशात धर्मा-धर्मात जातीभेद पसरवून जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. देशातील निवडणुका खुल्या वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. सरकारच्या कट-कारस्थानांना जनता बळी पडणार नाही. मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT