Use WhatsApp, Blog for information on agricultural schemes: Straw
Use WhatsApp, Blog for information on agricultural schemes: Straw 
मुख्य बातम्या

कृषी योजनांच्या माहितीसाठी व्हॉट्सॲप, ब्लॉगचा वापर ः भुसे

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हॉट्सॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. १३) सांगितले.

राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेऊन कृषी विस्तार कार्यामध्ये या बाबींचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन व्हॉट्सॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ब्लॉग, व्हॉट्सॲपचा वापर करण्यात येत आहे.

मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाइप करून पाठविणाऱ्यास स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस्) दिले आहेत. ते टाइप करून या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते. योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT