हळदीचे दर चांगले; मात्र उत्पादनात घट Turmeric rates well; But a decline in production
हळदीचे दर चांगले; मात्र उत्पादनात घट Turmeric rates well; But a decline in production 
मुख्य बातम्या

हळदीचे दर चांगले; मात्र उत्पादनात घट 

टीम अॅग्रोवन

अकोला : हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षात हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा हळदीच्या दरात तेजी असल्याने शेतकऱ्याने समाधान मानावे, अशी स्थिती असताना दुसरीकडे या भागात हळदीच्या उत्पादनात सरासरी २५ टक्क्यांपर्यंत घट असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

हळद काढणीचा मोसम सुरू झाला आहे. टप्प्याटप्पाने या कामाला वेग येत आहे. कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातीची हळद काढण्यात आली आहे. मात्र, सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या पारंपारिक वाणांची काढणी आता सुरू झाली. या हंगामात जास्त पाऊस झाल्याने काही भागात हळदीला कंदकुज दिसून आली होती. याचा फटका उत्पादनावर झालेला आहे. कंदकुज, करपा, धुक्यामुळे हळदीचे उत्पादन २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

दर चांगले पण उत्पादन कमी  मागील गेल्या काही वर्षात हळदीचे उत्पादन चांगले येत होते. परंतु तेव्हा दर नव्हते. यंदा दर चांगले मिळत आहेत. दरांबाबत समाधान व्यक्त होत असताना दुसरीकडे उत्पादनाने फटका दिला. ज्या शेतकऱ्यांना १२५ ते १३० क्विंटलपर्यंत उतारा यायचा ते यंदा १०० क्विंटलपर्यंत येऊन थांबले आहेत. ही ओली हळद वाळविण्यानंतर मोठ्या प्रमाणात कमी होते. १०० क्विंटल ओली हळद उकळून सुकविल्यानंतर १८ ते २० क्विंटलपर्यंत राहते. काढणीचा खर्चही मोठा झेलावा लागतो. सध्या या भागात हळदीचा दर ७००० ते ८५०० रुपयांपर्यंत सांगितला जात आहे. 

प्रतिक्रीया  यंदाच्या उत्पादनात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. पाऊस जास्त झाल्याने कंदकुज झाली होती. शिवाय किडींमुळेही फटका बसलेला आहे. कमी दिवसांत तयार होणाऱ्या वाणाचा आम्हाला एकरी १२५ क्विंटलपर्यंत उतारा आलेला आहे.  -सचिन कोकाटे, हळद उत्पादक, शिर्ला, ता. पातूर, जि. अकोला 

प्रतिक्रीया  हळद काढणी सुरू झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट दिसून आली आहे. यामुळे दर वाढले तरी हळद उत्पादकाला याची झळ सहन करावी लागेल.  -अनिकेत वाघमारे, हळद उत्पादक, मेहकर जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT