तूर
तूर  
मुख्य बातम्या

तूर खरेदी अडकली उत्पादकतेच्या आकडेवारीत

टीम अॅग्रोवन

अकोला  ः फेब्रुवारी महिना सुुरू झाला तरी तूर खरेदीची प्रक्रिया यंदा लांबत चालली आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाव नोंदणीचे आदेश देण्यात आले, परंतु खरेदीच्या अनुषंगाने मात्र पाऊल पुढे पडलेले नाही. तूर खरेदीसाठी लागणारी हेक्‍टरी उत्पादकतेची आकडेवारी प्राप्त झालेली नसल्याने खरेदी सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आधारभूत किमतीने खरेदीसाठी शासनाकडून राज्यात महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन, तसेच विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनला सूचना देण्यात आल्या आहेत. मूग, उडदाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेले केंद्रच तूर खरेदीसाठी निवडण्यात आले. ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. २३ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. प्रत्यक्षात खरेदीबाबत विचारणा केली असता, तुरीच्या हेक्‍टरी उत्पादकतेची आकडेवारी उपलब्ध झालेली नसल्याने ही प्रक्रिया सुरू करता आलेली नाही, असे सांगण्यात आले. कृषी विभागाकडून तुरीच्या हेक्‍टरी उत्पादनाची आकडेवारी शासनाकडे पोचल्यानंतर खरेदी किती करायची याचा आदेश यंत्रणांना मिळेल. तोपर्यंत खरेदीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे नसल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.  शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करण्याचे सांगितले आहे. ही प्रक्रिया सुरू झालेली असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसादसुद्धा गेल्या वेळेपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. सध्या खुल्या बाजारात या दरांच्या आसपास तुरीचे दर असल्याने तसेच चुकाऱ्यांबाबत येणारे मागील काळातील अनुभव लक्षात घेता शेतकरी सुद्धा शासकीय खरेदीबाबत फारसा उत्सुक नसल्याचे समोर येत आहे. प्रत्येकवेळी शासन कृषी खात्याकडून येणाऱ्या आकडेवारीचा फारसा विचार न करता सरसकट किंवा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खरेदीची घोषणा करीत असते.  यंत्रणांकडे मागील अनेक वर्षांतील सरासरी उत्पादकतेची माहितीही उपलब्ध आहे. असे असताना यंदाच्या उत्पादकतेच्या आकडेवारीसाठी खरेदी सुरू झालेली नसल्याने आता कृषी खात्याकडूनही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया ताटकळत ठेवली जात तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT