संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंद

टीम अॅग्रोवन

यवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तूर खरेदीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. यंदाही तशीच स्थिती होती. अनेक अडचणींमुळे पाहिजे त्या प्रमाणात तूर खरेदी सुरूच झाली नाही. रविवारपर्यंत (ता. २१) नाफेडच्या तूर खरेदीची मुदत होती. आजपासून (सोमवार) नाफेडची तूर खरेदी बंद होणार आहे.

जिल्ह्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना तुरीने बऱ्यापैकी तारले. असे असले तरी तूर विकताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. कधी बारदाना नाही, कधी गोदाम फुल्ल तर कधी ग्रेडरची अडचण असते. यंदा तर खरेदी विक्री संघाची थकीत रक्कम दिली नसल्याने तूर खरेदीच सुरू झाली नाही. जिल्ह्यात यावर्षी खूप उशिरा तूर खरेदी सुरू झाली.

खरेदी सुरू होताच नाफेडची मुदत संपण्याची वेळ येऊन ठेपली तरी पाहिजे त्या प्रमाणात खरेदीला गती मिळाली नाही. अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी भावात तुरीची विक्री करण्याची वेळी आली. अशातच रविवारी (ता. २१) नाफेडची तूर खरेदीची अंतिम मुदत संपली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या घरांत तूर शिल्लक आहे. नाफेडची खरेदी बंद झाल्यास खासगी बाजारात दर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खविसंचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जिल्ह्यात नाफेडची खरेदी उशिरा सुरू झाली. अशातच मुदत संपत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तूर खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी प्रवीण देशमुख, दत्तकुमार दरणे, अंकुश राऊत, शशिकांत देशमुख, बंडू कापसे, मिलिंद इंगोले, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.   ३० दिवस मुदतवाढीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून फेडरेशनने मुदतवाढीचा प्रस्ताव नाफेडकडे पाठविला आहे. या शिवाय सहायक निबंधक कार्यालयही एक महिना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT