Training on medicinal plants for tribal unemployed
Training on medicinal plants for tribal unemployed 
मुख्य बातम्या

आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील प्रशिक्षण

टीम अॅग्रोवन

कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी तालुक्याच्या पाथरज प्रभागातील मोरेवाडी येथील सभागृहात  ‘औषधी वनस्पती, लागवड, प्रक्रिया व विपणन’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला.

महाराष्ट्र आदिवासी वित्त मंडळाचे माजी महाव्यवस्थापक तथा समाजसेवक श्री. बाळकृष्ण तिरानकर यांच्या प्रेरणेने शेतकरी व बेरोजगार आदिवासी व्यक्तींसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थित पश्चिम विभागीय औषधी वनस्पती व माहिती केंद्र आणि आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मार्गदर्शक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्राचे प्रमुख डॉ. दिगंबर मोकाट तर अध्यक्षस्थानी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने हे  होते. व्यासपीठावर आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष मनोहर पादीर, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री चाहू सराई, प्रकाश बांगारे, धर्मा निरगुडा, काळूराम वरघडा, परशू दरवडा, जाणू बांगारे, लिंबाजी पिंगळे, गणपत पिंगळे, संजय मोरे, आकाश मिसाळ, पांडुरंग भगत, ए. के. शिद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान वनधन विकास योजना व केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष अभियानाची माहिती देत बाजारपेठेत मागणी असलेल्या वनौषधींच्या रोपांची निर्मिती, लागवड, प्रक्रिया, वनौषधींच्या बागांची, रोपवाटीकांची निर्मिती यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैदू प्रतिनिधी हरी भला, सहायक पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे, एल. जी. पिंगळा व के. के. शिद यांनी मनोगत व्यक्त केले.

या निमित्ताने तालुक्यातील नामवंत वैदू सर्वश्री विठ्ठल पारधी, परशुराम दरवडा, बुधाजी पारधी, पांडू भगत, जाणू बांगारे, हरी भला, जगदीश भला, नवसू आगीवले, धोंडू भगत, काळूराम थोराड, बाळू भगत, चंद्रकांत थोराड, भास्कर भगत, अनंता कडाळी, दसरथ उघडा, कमळू थोराड, चंदर भगत व अर्जुन झुगरे यांचा तसेच  १२ वीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या समीर सीताराम बांगारे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक मनोहर पादीर यांनी केले. तर सूत्रसंचालन संजय सावळा यांनी केले. प्रशिक्षणाला आदिवासी युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT