संजीवक फवारणी
संजीवक फवारणी 
मुख्य बातम्या

कृषी खात्याच्या भूमिकेमुळे संजीवके विक्रेत्यांना फटका

टीम अॅग्रोवन

पुणे: अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक संजीवकांचा वापर शेतकरी करीत असल्याचे कृषी खात्याचे निरीक्षण चुकीचे आहे. त्यामुळे आम्हाला संजीवके व वाढ उत्प्रेरके विक्रीत तोटा सहन करावा लागतो, अशी तक्रार अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.   ‘‘अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक संजीवकांचा वापर शेतकरी करतात. संजीवकांचा वापर केल्याने कापूस, सोयाबीनच्या हिरवेपणा व लुसलुशीतपणात वाढ होते. परिणामी, मोठ्या प्रमाणात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संजीवके व वाढ उत्प्रेरके वापर करु नये,’’ असे आवाहन आयुक्तांनी केले होते.

 संजीवके व वाढ उत्प्रेरकांच्या विरोधाबाबत कृषी खात्याने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात संघटनेने  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना लेखी निवेदन दिले आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही तत्पर असता. यवतमाळची विषबाधा प्रकरण ही दुर्दैवी घटना होती. तुमचे प्रयत्न योग्य आहेत. मात्र, वाढ उत्प्रेरकांच्या बाबत भूमिका अयोग्य आहे,’’ असे संघटनेने म्हटले आहे.   संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील व सचिव समीर पाथरे यांच्या म्हणण्यानुसार, वाढ उत्प्रेरके, संजीवकांमुळेच १०-२० टक्के उत्पादन वाढत असल्याचे अहवाल कृषी विद्यापीठांनी दिलेले आहेत. तरीही गेल्या वर्षी कृषी खात्याने बिगर नोंदणीकृत उत्पादनावर बंदी घातली होती. मात्र, बंदीला न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून आमच्या विक्रीस खाते अटकाव करीत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार करीत आहे. ‘‘तुमच्या भूमिकेमुळे शेतकरी वाढ उत्प्रेरके वापरणार नाहीत. यातून उत्पादक व विक्रेत्यांना प्रचंड तोटा होईल. टॉनिक, संजीवकांमुळे पाने टवटवीत होत असली तरी ते पूर्ण सत्य अजिबात नाही. त्याने कीड वाढते हे म्हणणे देखील खरे नाही. गेल्या २५ वर्षांपासून वाढ उत्प्रेरकांचा वापर केला जातोय. त्यामुळे गेल्या वर्षीच कीड वाढली, असे कसे म्हणता येईल,’’ असा सवाल संघटनेने विचारला आहे.  पाने टवटवीत झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो पाने टवटवीत झाल्यामुळे फायदा होत नसल्याचे आपले खाते कसे काय म्हणत आहे. शेतीमधील तज्ज्ञ आपल्या खात्यात आहेत. पिके पानांद्वारे अन्न पुरवठा प्रक्रिया सुरळीत पार पाडतात. त्यामुळे उत्पादन वाढते. संजीवकांना केंद्रीय कीटकनाशक मंडळाने नोंदणी क्रमांक दिला आहे. कृषी खात्यानेच संजीवकाला विक्री परवाना दिला आहे. त्यामुळे तुम्ही वापरास प्रतिबंध करणे योग्य नाही, असे संघटनेने म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT