Thousands of quintals of soybeans in the market
Thousands of quintals of soybeans in the market 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन

अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दररोज सोयाबीनची आवक वाढत आहे. सरासरी चार ते पाच हजारांदरम्यान दर मिळत आहे. वाशीम, खामगाव बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला सात ते आठ हजार पोत्यांची आव आहे. अकोल्यातही दीड हजार पोत्यांवर आवक पोचली आहे. 

सध्या सोयाबीन काढणीला वेग आला आहे. तयार झालेला माल थेट बाजार समित्यांमध्ये येत आहे. यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाणही २५ पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या दर्जाचा माल चार हजारांपर्यंत विकला जात आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५१०० दरम्यान भाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले. अनेकांचा शेतीमाल ओला झाला. आता पाऊस थांबल्यानंतर सोयाबीन मळणीने वेग घेतला.

तयार झालेले सोयाबीन अनेक जण तसेच विकून मोकळे होत आहेत. गावखेड्यात सोयाबीनची खरेदी ३५०० पासून ते ४५०० हजारांदरम्यान व्यापारी करीत आहेत. सोयाबीनमध्ये जितका ओलावा असेल, तितक्या प्रमाणात दर कमी होत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर पाच हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या आठवड्यात सोयाबीनची आवक आणखी वाढेल. दिवाळीपूर्वीच बाजार सोयाबीनच्या पोत्यांनी भरू लागले आहेत. गुरुवारी (ता. २१) खामगाव बाजार समितीत जवळपास आठ हजार पोत्यांची आवक होती.

वाशीममध्ये बुधवारी (ता. २०) सोयाबीनची ७८९५ क्विंटलची उलाढाल झाली. अकोल्यात १९८० पोत्यांची आवक होऊन ४२०० ते ४९०० दरम्यान दर भेटला. कारंजा, मूर्तिजापूर, अकोट, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, शेगाव, बाजार समित्यांमध्ये दररोज आवक वाढत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT