There will be an inquiry into the distribution of milch animals
There will be an inquiry into the distribution of milch animals 
मुख्य बातम्या

दुधाळ जनावरे वाटपातील घोळाची होणार चौकशी

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात गेल्या काळात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विशेष घटक योजनेतील दुधाळ जनावरे वाटपात घोळ झाल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात  वाटपातील घोळ समोर येण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्हा परिषदेमार्फत काही वर्षांपूर्वी विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची योजना राबविण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी आता प्राप्त होत आहेत. हा प्रकार जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये २६९ आणि सन २०१६-१७ मध्ये २८० म्हशींचे वितरण करण्यात आले होते.

जिल्हा परिषद सेस फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवीत असते. त्यासाठी विविध विभागांना निधी सुद्धा देण्यात येतो. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेतील कारभारावर देखरेखीसाठी स्थापन केली होती. सदर प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनी आणि काही प्रमुख जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर वंचितचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आता या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या चौकशीवर सत्ताधाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

यापूर्वी पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळी दुधाळ जनावरे वितरणाच्या प्रक्रियेतील घोळाबाबत चर्चा झाली होती. समितीने तेव्हा दापुरी, मनब्दा, भांबेरी येथे भेट देत लाभार्थ्यांशी संवाद साधला होता. दुधाळ जनावरे वाटप प्रक्रिया काही ठिकाणी कागदोपत्रीच राबविण्यात आली काय, सवाल तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुधाळ जनावरे वाटपाच्या चौकशीत नेमके काय तथ्य बाहेर येते याकडे जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT