...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ. भुयार ...... then MSEDCL office will be burnt down: b. Basement
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ. भुयार ...... then MSEDCL office will be burnt down: b. Basement 
मुख्य बातम्या

...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ. भुयार

टीम अॅग्रोवन

अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याची तत्काळ दखल घेत यावर नियंत्रण न मिळविल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय जाळण्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. 

मोर्शी वरुड तालुक्यात हलगर्जीपणामुळे १६ केव्हीचे २५ ट्रांसफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रांसफार्मर, १०० केव्हीचे ४० ट्रांसफार्मर, असे एकूण ८५ ट्रांसफार्मर नादुरुस्त आहेत. रब्बी हंगामात शेतकरी त्यांच्याकडील संरक्षित सिंचन पर्यायातून पाण्याचा उपसा करतात त्याकरिता त्यांना विजेची गरज भासते. मात्र नादुरुस्त ट्रान्सफार्मरमुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे आढावा बैठक घेऊन दोन्ही तालुक्यातील नादुरुस्त ८५ ट्रांसफार्मर व  सिंगल फेज लाईन दुरुस्तीची निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही ट्रांसफार्मर दुरुस्तीबाबत हालचाल झाली नाही. अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पाहून या संदर्भाने महावितरण अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा आमदार भुयार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देखील अधिकाऱ्यांकडून करण्याचे संकेत त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT