सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूच
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूच 
मुख्य बातम्या

सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूच

टीम अॅग्रोवन

सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी द्यावी आणि चालू हंगामात एफआरपी अधिक दोनशे रुपये द्यावेत, या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी (ता. १९) पाचव्यादिवशी उपोषण सुरूच होते. दरम्यान, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून, सोमवारी उपोषणकर्त्यांची डॉक्‍टरांनी तपासणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, बापू गायकवाड, नवनाथ माने, श्रीनिवास भोसले, मदनसिंह जाधव आणि बापू कोडक यांची प्रकृती खालावत चालली आहे.

या वर्षीच्या उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये व मागील वर्षीच्या हंगामातील सिद्धेश्वर, मातोश्री आणि गोकुळ या साखर कारखान्यांनी खोटी माहिती देऊन थकवली, त्यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच एफआरपी चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना, यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊनही पहिला हप्ता जाहीर होत नाही, तो त्वरित व्हावा, या विषयावर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

सोमवारी पाचव्या दिवसापर्यंतही कारखाना किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी या उपोषणाकडे फिरकले नाहीत. लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, विजय रणदिवे, उमाशंकर पाटील यांनी केली आहे, अन्यथा आणखी आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT