Of 'Swabhimani' at Bodkha Self-torture movement on the tree
Of 'Swabhimani' at Bodkha Self-torture movement on the tree 
मुख्य बातम्या

बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर आत्मक्लेष आंदोलन

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून आत्मक्लेष आंदोलन केले. 

विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे.  संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात कार्यकर्त्यांनी झाडावर चढून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा डिक्कर यांनी दिला. 

या आंदोलनामध्ये युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, नयन इंगळे, विलास बोडखे, मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कर, गोकूळ गावंडे, अमोल आगरकर, गजानन सोळे, प्रमोद बान्हेरकर, जया ठाकरे, विष्णुदास मुरुख, विशाल गव्हाळे, शिवचरण बान्हेरकर, निखिल गावंडे, महादेव तेल्हारकर, उमेश नेरकर,प्रतिक उमाळे, दामू सोळे, अक्षय नेरकर, शुभम ठाकरे आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT