सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली
सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली

टीम अॅग्रोवन

सातारा  : गेले काही दिवस ऊसदराबाबत झालेली कोंडी अखेर अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल म्हणून प्रतिटनास २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून फोडली आहे. त्यामुळे आता इतर कारखाने किती दर काढणार, तसेच पहिल्या उचलीबाबत शेतकरी संघटना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागणार आहे.  ऊस गाळप हंगाम सुरू होताना शेतकरी संघटना व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत पहिल्या उचलीपोटी एकरकमी एफआरपी व साखरेचे दर वाढल्यास २०० रुपये असा पॅटर्न स्वीकारण्यात आला होता. पण, त्यानंतर साखरेच्या दरात मोठी घसरण होऊन ते प्रतिक्विंटल २९०० ते २९५० दरम्यान आल्याने राज्यातील सर्वच कारखान्यांनी पहिल्या उचलीबाबत मौन पाळले. परिणामी, हंगाम सुरू होऊनही दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला तरी पहिली उचल दिली गेली नव्हती. साखरेच्या दरात घसरण झाल्याने बॅंकांकडूनही कारखान्यांना त्या तुलनेत कमी कर्जपुरवठा झाला. बॅंकांकडून मिळणाऱ्या कर्जातून वाहतूक, तोडणी व प्रक्रिया खर्च वजा करता एकरकमी एफआरपी देणे शक्‍य होणार नसल्याचे कारखान्यांकडून अगोदरपासून सांगितले जात होते. मात्र, शेतकरी संघटनांकडून ठरल्याप्रमाणे एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे, अशी मागणी कायम होती. तसे न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. या कारणामुळे साखर कारखान्यांनी पहिल्या उचलीस विलंब लावला होता. तर ऊस जाऊनही पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.   साखरेचे घसरणारे दर पाहता, कारखाने किती उचल देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतानाच, शेंद्रे येथील अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने त्याबाबत धाडसी पाऊल उचलत प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. अजिंक्‍यतारा कारखान्याचा दर आणि एफआरपीचा विचार करता ८०-२० चा फार्म्युला स्वीकारला गेल्याचे दिसत आहे. त्यावर आता जिल्ह्यातील अन्य कारखाने कधी व किती उचल देणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

SCROLL FOR NEXT