ऊसावर हुमणीचा प्रादुर्भाव
ऊसावर हुमणीचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

माजलगाव तालुक्यात उसाला ‘हुमणी’चे ग्रहण

टीम अॅग्रोवन

माजलगाव, जि. बीड  : कापसाचे पिके सलाइनवर आहे. कापूस, सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच आता उसालाही ‘हुमणी’चे ग्रहण लागल्याने तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे.

जून महिन्याच्या सुरवातीलाच पडलेल्या समाधानकारक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; परंतु जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठा खंड पडल्याने खरिपाची सर्वच पिके सलाइनवर आहेत. यावर्षीही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर उपाययोजना करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहे. रिमझिम पावसावर कशाबश्या आलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या शेंगावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.

यामुळे नगदी पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता ऊस पिकावरही हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात एकूण १७ हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या उसाचे पीक जोमात असताना तालुक्यातील अनेक गावांत हुमणीमुळे या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. हुमणीचा विळखा वाढत असल्याने तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.

उत्पादन घटणार खरीप हंगामात २३ हजार ५९ हेक्टरवरील सोयाबीन, ३० हजार ७८३ हेक्टरवरील कापूस, १७ हजार हेक्टरवरील उसावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने खरीप उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज शेती तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याबाबत कृषी विभाग उपाययोजनेबाबत जनजागृती करीत आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी. पी. कुंभार यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT