आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी 
मुख्य बातम्या

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना येणाऱ्या काळात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक दरापेक्षा कमी असले तरी जगभरातील खरेदीदारांनी साखरेची खरेदी वेगाने सुरू केली आहे. परिणामी, निर्यात साखरेच्या दरात क्विंटलला शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील साखरेवर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत रिफायनरी साखरेच्या तुलनेत इंडियन व्हाईट शुगरला चांगला दर मिळत असल्याने आगामी काळात कारखान्यांना जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याची संधी आहे. देशातील साखर कारखान्यांनी पुरेशी साखर निर्यात न केल्याने केंद्र त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांना निर्यात करण्याची ही चांगली वेळ असल्याचे निर्यातदारसूत्रांनी सांगितले. राज्यातून एप्रिलच्या अखेरपर्यंत दहा लाख टनांहून अधिक साखरेची निर्यात झाली. परंतु, दर कमी असल्याने अनेक कारखाने हंगामाच्या पहिल्या टप्यात दिलेल्या कोट्यानुसार साखरेची निर्यात करू शकले नाहीत. काहींनी कच्ची साखर सुरवातीच्या टप्प्यात निर्यात केली आहे. त्यांचे अनुदान अद्याप कारखान्यांना मिळाले नाही. अनुदान वेळेत मिळत नसल्याने कारखाने निर्यातीसाठी चालढकल करीत आहेत. परंतु, भविष्यातील फायद्यासाठी सध्या वाढलेल्या दरात साखर कारखाने निर्यातीला प्राधान्य देऊ शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. भविष्यातील गरज ओळखून खरेदीदारांची पसंती आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक बाजारापेक्षा कमीच आहेत. पण, तरीही जगभरातील देशांची मागणी पुरविण्यासाठी तेथील अंदाज घेऊन आंतराष्ट्रीय बाजारात खरेदीदारांनी साखरेच्या खरेदीला पसंती देण्यास सुरवात केली आहे. सुरवातीच्या टप्‍प्यात ज्या साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली त्या वेळी त्यांना क्विंटलला १९०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. आता हा दर २१५० ते २२०० रुपयांपर्यंत गेला आहे. खरेदीदारांनी चढ्या भावात साखर खरेदी करण्यास सुरवात केल्याने याचा फायदा कारखान्यांना होऊ शकेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. अशी आहे राज्यातील साखर स्थिती (टन)

  • यंदाचा हंगाम सुरू होण्याअगोदर शिल्लक साखरः ५३ लाख
  • यंदा उत्पादित झालेली साखरः १०७ लाख
  • शिल्लक व तयार मिळून साखरः १६० लाख
  • यंदाची विक्री (स्थानिक व निर्यात)ः ६० लाख
  • शिल्लक साखरः १०० लाख
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

    Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

    Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

    Rabadi Production Industry : रबडी निर्मितीद्वारे मिळवला दरांचा योग्य मोबदला

    Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

    SCROLL FOR NEXT