Sugar Factory
Sugar Factory  
मुख्य बातम्या

टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के एफआरपी अदा 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ९७ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे. पंधरा जून अखेर १३ हजार ५०८ कोटी रुपयांपैकी १३ हजार १४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप ३५९ कोटी रुपये कारखान्यांकडे प्रलंबित आहेत. तर राज्यातील १०७ कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. 

यंदा १४४ साखर कारखान्यांनी गळितास प्रारंभ केला. हंगामाच्या शेवटी शेवटी म्हणजे पंधरा मार्चनंतर राज्यात कोविडचे संकट सुरू झाले. पंधरा मार्चपर्यंत राज्यातील नव्वद टक्के गळीत हंगाम संपला होता. मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेर राज्यात ४९२ लाख टन गाळप झाले होते. यानंतर हंगाम संपेपर्यंत पुन्हा ५८ लाख टनांचे गाळप झाले. मार्चच्या मध्यापर्यंत चाळीस कारखाने बंद झाले होते. मार्चच्या उत्तरार्धात कोविड प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. तरीही कारखान्यांनी यानंतर एक महिना गाळप सुरू ठेवले.  एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात साखर हंगाम पूर्ण झाला. शेवटच्या टप्प्यात ऊस गाळपासाठी कारखान्यांना झगडावे लागले. प्रशासनाचा बडगा व मजुरांची धावपळ यामुळे कारखानदारांची चांगलीच धावपळ झाली. यातच ऐन हंगामातच साखर मागणीत घट आल्याने कोट्यातील साखर विक्री करण्यासाठी कारखानदारांची चांगलीच कसरत झाली. या पार्श्‍वभूमीवरही अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली. 

कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या रकमेला प्राधान्यक्रम देऊन एफआरपीची रक्कम भागविण्याचे प्रयत्न केले. कारवाईच्या भीतीनेही अनेक कारखान्यांनी एफआरपीची जुळवाजुळव केली. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांची अपेक्षित साखर विक्री झाली नाही. यामुळे कामगारांची देणी, इतर पुरवठादार व अन्य खर्च अद्यापही प्रलंबित असल्याने कारखान्यांपुढील संकट कायम असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.  दृष्टिक्षेपात गळीत हंगाम ( २०१९-२०)  गाळप हंगाम सुरू केलेले कारखाने: १४४  एकूण गाळप: ५५० लाख टन  एफआरपीची एकूण रक्कम: १३ हजार ५०८ कोटी  अद्याप देय रक्कमः ३५९ लाख कोटी रुपये  पूर्ण एफआरपी दिलेले कारखानेः  १०७  ८० ते ९९ टक्के रक्कम अदा केलेले कारखानेः २५  ६० ते ८० टक्के रक्कम अदा केलेले कारखानेः  ८  ६० टक्केपर्यंत एफआरपी दिलेले कारखानेः  ४  (स्त्रोत- साखर आयुक्तालय) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT