ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्य
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्य 
मुख्य बातम्या

ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप हंगाम वाढविण्यासाठी भविष्यात ऊसरसात शर्कराकंदाचे २० टक्के मिश्रण करून दर्जेदार साखरनिर्मिती शक्य आहे. तसेच या कंदापासून थेट इथेनॉलदेखील करता येईल, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.   व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍या नेतृत्वाखाली अलीकडेच शास्त्रज्ञांनी युरोप दोरा करून शर्कराकंदापासून साखर उत्पादनाची माहिती घेतली. गेल्या दहा वर्षांपासून कंदावर सुरू असलेल्या व्हीएसआयच्या चाचण्या यशस्वी ठरत आहेत. यापूर्वी राज्यात समर्थ आणि सर्वोदय साखर कारखान्यात शर्कराकंदाच्या चाचण्या घेतल्या गेल्या. आता बारामती अॅग्रो युनिटमध्ये चाचण्या होणार आहेत. पाणीटंचाईमुळे पाणी बचत करणाऱ्या शर्कराकंदाकडे आता कारखान्यांचे लक्ष वेधले गेले आहे. युरोपात शर्कराकंद पीक तीन हंगामात घेतात. तेथे प्रतिएकर उत्पादन ३५ टन आणि साखर उताराही चांगला मिळतो. याशिवाय इथेनॉल, चारा म्हणून शर्कराकंदाचा उपयोग केला जातो. राज्यात मात्र शर्कराकंद हा उसाला भक्कम पर्याय होऊ शकत नाही. तरीही शर्कराकंद रसाचे मिश्रण ऊसरसात करता येईल. त्यासाठी कारखान्यांना डिफ्युजर, स्लायसर बसवावे लागतील.  "राज्यात शर्कराकंदाचे उत्पादन फक्त हिवाळ्यात घेता येईल. पीक सहा महिन्यांचे असून एप्रिलमध्ये गाळपाला ऊस संपत आलेला असतानाचा शर्कराकंदाचे पीक हाताशी मिळते. त्यापासून ऊसरसात २० टक्के मिश्रण होऊ शकते. थेट इथेनॉलदेखील करता येईल. शर्कराकंद ५ किलोपर्यंत मिळत असला तरी अडीच किलोच्या कंदात जास्त साखर सापडते. या पिकामुळे ऊसशेतीत ५० टक्के पाणी बचत होईल," असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.    

शर्कराकंदाच्या लागवड खर्चाचा अभ्यास झाला आहे. उसापेक्षाही कंदाचे पीक परवडते. पंजाबमध्ये राणा शुगरने ८ हजार एकरवर कंद लावला आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील शर्कराकंद लागवडीला प्रोत्साहन देता येईल. त्यामुळे पाणी बचत होते. क्षारपड जमिनीतही पीक चांगले येते. - विकास देशमुख, संचालक, व्हीएसआय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT