वसतिगृहातील सहकारी मेसमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना विद्यार्थिनी.
वसतिगृहातील सहकारी मेसमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना विद्यार्थिनी. 
मुख्य बातम्या

कृषी विद्यार्थिनी चालवितात सहकारी तत्त्वावर मेस

माणिक रासवे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत विविध विद्याशाखांतील विद्यार्थिनी वसतिगृहांमधील सहकारी तत्त्वावरील मेसमुळे माफक खर्चामध्ये पोटभर सकस जेवण मिळते. यासोबत विद्यार्थिनी मेस मॅनेजमेंटचा धडाही गिरवित आहेत.   विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सुरवातीची काही वर्षे विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या जेमतेम ६० ते ७० असायची. यामध्ये आसाम, मणिपूर, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांतील विद्यार्थिनींची संख्या ५० टक्के होती. तेव्हा विद्यार्थिनींसाठी एक वसतिगृह होते, परंतु मेस नव्हती. विद्यार्थिनींना जेवणासाठी परभणी शहरातील खासगी मेसमध्ये जावे लागत असे. विद्यार्थिनींची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठ व्यवस्थापनाने वसतिगृहामध्ये मेस सुरू केली. परंतु पुढे अपुऱ्या मनुष्यबळअभावी मेस बंद पडली.

गृहविज्ञान महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्य डाॅ. श्यामला हारोडे यांच्या संकल्पनेतून १९८० मध्ये  दक्षिण भारतातील विद्यार्थिनींच्या मेसच्या धर्तीवर विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये सहकारी तत्त्वावर मेस सुरू करण्यात आली. सध्या सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरातील चार वसतिगृहामध्ये दरवर्षी ५२० ते ५६० विद्यार्थिनी वास्तव्यास असतात. त्यांना या सहकारी मेसचा फायदा होत आहे. दोन वेळच्या जेवणासाठी खाजगी मेसमध्ये महिन्याला २,००० ते ४,००० रुपये खर्च येतो. परंतु सहकारी मेसमध्ये प्रत्येक विद्यार्थिनीकडून महिन्याला ७०० ते ७५० रुपये मेस शुल्क तसेच स्वयंपाकी महिलांचे लेबर चार्जेस दरमहा १२० रुपये याप्रमाणे प्रत्येक सहा महिन्याचे ७२० रुपये शुल्क आगाऊ घेतले जाते. दररोजच्या जेवणाचे पदार्थ विद्यार्थिनीच ठरवतात. वरण, भाजी, पोळी, भात, कोशिंबीर असे पोटभर जेवण मिळते. आठवड्यातून एकवेळ गोड जेवण असते. सणावारांनुसार पक्वांनाचा बेत असतो.

विद्यार्थिनी करतात मेसचे व्यवस्थापन 

  • महिन्यातील प्रत्येक पंधरवड्यामध्ये आलटून पालटून आठ विद्यार्थिनींवर मेस व्यवस्थापनाची जबाबदारी.
  •  प्रत्येकी चार विद्यार्थिनींना हिशेब आणि मेस व्यवस्थापनाचे काम. प्रत्येक विद्यार्थिनीचा कोणत्या न कोणत्या वर्षी मेस व्यवस्थापनामध्ये सहभाग.
  • धान्य, भाजीपाला, किराणा खरेदी करून मेस मॅनेजर काम करणाऱ्या विद्यार्थिनींकडे नियोजनाची जबाबदारी.
  • विद्यार्थिनींच्या संख्येनुसार दररोजच्या जेवणाचे नियोजन. त्या प्रमाणात स्वयंपाकी महिलांना शिधासामग्रीचे वाटप. उपलब्ध सामग्रीचा काटकसरीने वापर.
  •  ३० ते ५० विद्यार्थिनींमागे एक याप्रमाणे प्रत्येक मेसमध्ये परभणी शहरातील चार गरीब गरजू महिलांची स्वयंपाकी म्हणून नियुक्ती. त्यांना जेवणासोबतच दरमहा रोख मजुरी.
  •  डायनिंग हाॅलच्या स्वच्छतेची जबाबदारी विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडे. दरमहा मेस खर्चाचे लेखा परीक्षण. 
  • माफक दरामध्ये दर्जेदार जेवण
  • आवडीनुसार जेवण तयार करता येते. अन्य मेसच्या तुलनेत कमी खर्चात दर्जेदार जेवण मिळते. व्यवस्थानाचे कौशल्यदेखील आत्मसात होत आहे. - ज्योती गरड, विद्यार्थिनी

    सहकारी मेसमध्ये भाजीपाला, किराणा आम्ही काटकसरीने वापरतो. याचा पुढील काळात निश्चित उपयोग होणार आहे. - सोनल जाधव, विद्यार्थिनी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

    Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    SCROLL FOR NEXT