नाशिक जिल्हास्तरीय ‘ पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेस प्रारंभ
नाशिक जिल्हास्तरीय ‘ पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेस प्रारंभ 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्हास्तरीय ‘ पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ रविवारी (ता.२४) विभागीय आयुक्त राजाराम माने याच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण देशात एकाच वेळी ही योजना सुरु होत असल्याचे आयुक्त माने यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोरखपुर(उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. 

नाशिक विभागात पात्र लाभार्थ्यांपैकी दहा लाख शेतकऱ्यांची माहिती संकलित झाली आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. माहिती संकलित करण्यासाठी तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे नमूद करून त्यांच्यासह कमी कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे माने यांनी अभिनंदन केले. मान्यवरांच्या हस्ते दहा लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील ३ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ होणार असल्याचे सांगून ८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याची माहिती माने यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात या योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ झाला.  यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., कुलगुरु ई.वायुनंदन, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कृषी सहसंचालक रमेश भताणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांसह शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT